राज्यात सर्वाधिक 9423 क्विंटल तुरीची आवक अमरावती बाजार समितीमध्ये झाली. इथे तुरीला कमीत कमी 7450 तर जास्तीत जास्त 7998 रुपये एवढा दर मिळाला. तर सर्वाधिक 8500 रुपयांचा दर करमाळा बाजार समितीत काळया रंगाच्या तुरीला मिळाला.
APMC Market: आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
advertisement
सोयाबीनच्या आवकमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाशिम बाजार समितीमध्ये सर्वाधिक 2100 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. इथे सोयाबीनला कमीत कमी 4950 ते जास्तीत जास्त 6150 रुपये एवढा दर मिळाला. सोयाबीनला सर्वाधिक दर हा वाशिम बाजार समितीत मिळाला.
राज्यात सर्वाधिक 46,242 क्विंटल कांद्याची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये झाली. इथे कांद्याला कमीत कमी 100 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 2050 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. राज्यात सर्वाधिक 2200 प्रतिक्विंटल असा दर हिंगणा या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला.
राज्यात सर्वाधिक 7050 क्विंटल कापसाची आवक हिंगणघाट बाजार समितीमध्ये झाली. इथे कापसाला कमीत कमी 7 हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 8010 प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. कापसाचे दर मागील काही दिवसांपासून दबावत असल्याचे पाहायला मिळत असून दर हे सात ते आठ हजारांच्या दरम्यान आहेत.





