निवृत्ती घेताना अमित मिश्रा भावूक
आज मी 25 वर्षांनंतर क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. हा खेळ माझे पहिलं प्रेम, माझे शिक्षक आणि माझ्या आनंदाचा सर्वात मोठा स्रोत आहे. हा प्रवास असंख्य भावनांनी भरलेला आहे. अभिमानाचे, कष्टाचे, शिकण्याचे आणि प्रेमाचे क्षण यामधून मला मिळाले. सुरुवातीच्या काळात झालेल्या संघर्ष आणि त्यागांपासून ते मैदानावरील अविस्मरणीय क्षणांपर्यंत, प्रत्येक अध्याय हा एक अनुभव आहे ज्याने मला क्रिकेटपटू म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आकार दिला, असं अमित मिश्रा म्हणाला.
advertisement
क्रिकेटने मला सर्वकाही दिलं आता...
माझ्या कुटुंबाला - चढ-उतारांमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या सहकाऱ्यांना आणि मार्गदर्शकांना हा प्रवास इतका खास बनवल्याबद्दल त्याचे देखील आभार मानतो. हा अध्याय संपवताना, माझे हृदय कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेले आहे. क्रिकेटने मला सर्वकाही दिलं आहे आणि आता, मी त्या खेळाला परत देण्यास उत्सुक आहे ज्याने मला मी कोण आहे ते बनवले, असंही अमित मिश्रा याने म्हटलं आहे.
IPL मध्ये तीन हॅटट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज
अमित मिश्रा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा सातवा गोलंदाज आहे, त्याने 162 सामन्यांमध्ये 174 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये तीन हॅटट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. या हॅटट्रिक तीन वेगवेगळ्या संघांकडून खेळताना आल्या. अमित मिश्राने 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, 2011 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून खेळताना हॅटट्रिक नावावर केली होती.