TRENDING:

Anil Kumble : 'श्रेयसला स्वतःला वारंवार सिद्ध करावं लागतंय...', कुंबळेंनी सांगितली KKR ची सर्वात मोठी चूक!

Last Updated:

Anil kumble KKR decision : मॅचविनर खेळाडूंना संघातून जाऊ देणं, हा केकेआरचा सर्वात चुकीचा निर्णय होता, असं कुंबळे म्हणाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Anil kumble On Shreyas Iyer : आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने कमालीची कामगिरी केली अन् श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली. मात्र, यावेळी क्रेडिट गौतम गंभीर घेऊन गेला. पण 2025 ला श्रेयसने पुन्हा धमाका केला अन् पंजाब किंग्जकडून खेळताना संघाला फायनलमध्ये पोहोचवलं. अशातच आता टीम इंडियाचा माजी दिग्गज अनिल कुंबळे यांने मोठं वक्तव्य केलं आहे. अनिल कुंबळे याने कोलकाता नाईट रायडर्सच्या रिटेन्शन पॉलिसीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
Anil kumble on kkr retention Big mistake over Shreyas iyer
Anil kumble on kkr retention Big mistake over Shreyas iyer
advertisement

केकेआरचा सर्वात चुकीचा निर्णय

'जिओ हॉटस्टार'च्या एका विशेष कार्यक्रमात बोलताना कुंबळे म्हणाला की, दोन वर्षांपूर्वी केकेआरला तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात श्रेयस अय्यर आणि फिल सॉल्ट यांची भूमिका अत्यंत मोलाची होती. मात्र, अशा मॅचविनर खेळाडूंना संघातून जाऊ देणं, हा केकेआरचा सर्वात चुकीचा निर्णय होता, असं कुंबळे म्हणाला. फिल सॉल्ट आता आरसीबीमध्ये गेला असून त्याने गेल्या वर्षी त्या टीमला पहिले जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

advertisement

KKR कडे कॅप्टन उरलेला नाही

दुसरीकडे, KKR कडे आता आयपीएल जिंकलेला कोणताही कॅप्टन उरलेला नाही. अजिंक्य रहाणे हा अत्यंत अनुभवी खेळाडू आहे. त्याने घरगुती क्रिकेटमध्ये मुंबईचे आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केलंय. मात्र, एक कॅप्टन म्हणून त्याने अद्याप आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली नाही. KKR ला आता आपले महत्त्वाचे खेळाडू जपायला शिकावे लागेल, अन्यथा त्यांना ट्रॉफी जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असंही कुंबळे म्हणाला.

advertisement

श्रेयसला नेहमीच कमी लेखले गेलं

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाचे कौतुक करताना कुंबळे म्हणाले की, श्रेयसला नेहमीच कमी लेखले गेलं आहे. एका फ्रँचायझीसोबत ट्रॉफी जिंकल्यानंतर दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये जाणं सोपं नसतं. तिथलं व्यवस्थापन, वातावरण आणि दबाव पूर्णपणे वेगळा असतो. पंजाब किंग्सने गेल्या 10 वर्षात फायनल खेळली नव्हती, पण श्रेयसने तिथे गेल्यावर पहिल्याच सीजनमध्ये त्यांना फायनलपर्यंत पोहोचवले. त्याच्या नेतृत्व गुणांनी मी प्रचंड प्रभावित झालोय, असं देखील कुंबळे म्हणाला आहे.

advertisement

वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक चवीची अस्सल भेळ, पुण्यात एकाच ठिकाणी खा 3 प्रकार, किंमत 60 रुपये! Video
सर्व पहा

याशिवाय, कुंबळे असं मत व्यक्त केलंय की, काही खेळाडूंना वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि श्रेयस अय्यर त्यापैकीच एक आहे. चांगली कामगिरी करूनही त्याच्यावर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात, पण तो एक विलक्षण लीडर आहे हे सत्य नाकारता येत नाही, असंही अनिल कुंबळे म्हणाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Anil Kumble : 'श्रेयसला स्वतःला वारंवार सिद्ध करावं लागतंय...', कुंबळेंनी सांगितली KKR ची सर्वात मोठी चूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल