TRENDING:

Arjun Tendulkar : 6 बॉल सहा यॉर्कर, अर्जुनची बुमराहपेक्षा भेदक ओव्हर,पंतही घाबरला, VIDEO

Last Updated:

खरं तर मुंबई इंडियन्स संघात संधी मिळत नसल्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा लेक अर्जुन तेंडुलकरने फ्रेंचायजीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर तो लखनऊ सूपर जाएटस संघात आला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Arjun Tendulkar VIDEO : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिअमवर सूरूवात होणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला सोडचिठ्ठी दिलेल्या अर्जुन तेंडुलकरने धमाका केला आहे. अर्जुन तेंडुलकरने नेटसमध्ये इतकी जबरदस्त गोलंदाजी केली आहे, पंत देखील त्याच्यासमोर फलंदाजी करताना अडखळताना दिसला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
arjun Tendulkar net bowling
arjun Tendulkar net bowling
advertisement

खरं तर मुंबई इंडियन्स संघात संधी मिळत नसल्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा लेक अर्जुन तेंडुलकरने फ्रेंचायजीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर तो लखनऊ सूपर जाएटस संघात आला होता. लखनऊ सुपर जाएटसने आतापर्यंत या हंगामात फक्त 2 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांना एका सामन्यात पराभवाचा सामना कराला लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात लखनऊ जिंकली होती. आता या दोन्ही सामन्यात अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सूपर जाएटसकडून खेळायची संधी मिळाली नव्हती.असे असले तरी तो मैदानात कसून सराव करताना दिसतो आहे.

advertisement

लखनऊ सूपर जाएटसने अर्जुन तेंडुलकरच्या बॉलिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकर बॉलिंगचा सराव करताना दिसला आहे. या सरावा दरम्यान अर्जुन तेंडुलकर समोर रिषभ पंत फलंदाजी करताना दिसला होता. यावेळी अर्जुन तेंडुलकरच्या यॉर्कर गोलंदाजीसमोर रिषभ पंत हतबल दिसला होता. अर्जुन तेंडुलकर इतके तिखट यॉर्कर टाकत होता की पंत अडखळताना दिसत होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कुठे तरी सुरुवात करावी लागते! रस्त्यावर उभं राहून प्रोडक्ट विकले, आता वर्षाला 20 कोटींचा बिझनेस! Video
सर्व पहा

दरम्यान मागच्या अनेक दिवसांपासून अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाचीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत तो उत्कृष्टपणे गोलंदाजी करताना दिसतो आहे.त्यामुळे त्याची ही गोलंदाजी पाहून त्याला लवकरच लखनऊ सुपर जाएटसच्या टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान ही वेळ नेमकी कधी येणार आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : 6 बॉल सहा यॉर्कर, अर्जुनची बुमराहपेक्षा भेदक ओव्हर,पंतही घाबरला, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल