खरं तर आशिया कपमध्ये पाकिस्तानची रडारड सूरू आहे. कुठलाही मुद्दा घेऊन पाकिस्तान आडमुठेपणाची भूमिका घेतेय. कारण भारताने सामन्या दरम्यान हस्तांदोलन केलं नव्हत. विशेष म्हणजे मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन होणार नसल्याचं पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याला सांगितलं होतं. यानंतर पीसीबीने ऍन्डी पायक्रॉफ्ट यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. पण ही मागणी पीसीबीने फेटाळली होती. त्यानंतर पाकिस्तान चांगलीच आक्रामक झाली आहे.
advertisement
ही परिस्थिती लक्षात घेता भारतीय खेळाडूंना आशिया कपमध्ये पाकिस्तानी नेट गोलंदाजांपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.मंगळवारी दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये भारतीय खेळाडू अंतिम गट अ सामन्यासाठी सराव करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना हे कडक आदेश देण्यात आले.
जिओ न्यूजमधील वृत्तानुसार, संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला "पाकिस्तानी नेट गोलंदाजांपासून अंतर राखण्याचे" निर्देश दिले आहेत. आयसीसी अकादमीमध्ये, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत - सर्व मूळचे नेट गोलंदाज सहभागी संघांना त्यांच्या सराव दरम्यान मदत करण्यासाठी उपस्थित असतात. पण आता भारतीय खेळाडूंना पाकिस्तानी नेट बॉलर पासून दूर राहण्यास सांगितले आहे.
सूत्रांनी पाकिस्तानी माध्यमांना सांगितले की,भारतीय खेळाडूंना पाकिस्तानी नेट बॉलरसोबत अनौपचारिक संभाषण करू नका किंवा फोटो काढू नका असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच अहवालात पुढे म्हटले आहे: पालन सुनिश्चित करण्यासाठी, नेट बॉलरना सराव सत्रापूर्वी त्यांचे मोबाईल फोन देणे आवश्यक आहे, जे सराव संपल्यानंतरच परत केले जातात.
भारतीय संघाने बुधवारी होणारे त्यांचे सराव सत्र आणि सामन्यापूर्वीचे प्रेस देखील रद्द केले, त्याला विश्रांतीचा दिवस म्हटले.उद्या मीडिया आणि सराव सत्र होणार नाही याची कृपया नोंद घ्या. आज विश्रांतीचा दिवस आहे. गुरुवारच्या सामन्यापूर्वीच्या पीसीसाठी सराव आणि पीसी वेळ नंतर कळवेल, असे बीसीसीआयने अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये म्हटले आहे.