अफगाणिस्तानचा 25 वर्षीय युवा खेळाडू अझमतुल्लाह उमरजाईने 21 बॉलमध्ये 53 धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे. या दरम्यान त्याने पाच षटकार आणि दोन चौकार लगावले आहेत.या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 252 इतका होता.
खरं 13 ओव्हरपर्यंत अफगाणिस्तान अवघ्या 4 विकेट गमावून 95 धावाच ठोकू शकली होती. त्यामुळे पुढच्या 7 ओव्हरमध्ये 150 हुन अधिक धावा ठोकणे खूपच कठिण होते. पण अझमतुल्लाह उमरजाई आणि सेदीकुल्ला अटलने या दोघांनी अफगाणिस्तानचा डाव 188 धावापर्यंत नेला होता. अफगाणिस्तानकडून सेदिकुल्लाने नाबाद 73 धावांची खेळी केली होती.त्याने 52 बॉलमध्ये या धावा ठोकल्या होत्या.या खेळीत त्याने 3 षटकार आणि 6 चौकार लगावले आहेत.
अफगाणिस्तानने आता 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 188 धावा ठोकल्या आहेत. हॉगकॉंगकडून आयुष शुक्ला आणि किंचित शाहने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आहेत. तर आतिक इकबाल आणि एहसान खानने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.आता हॉगकॉग हे लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरते की अफगाणिस्तान त्यांना रोखण्यात यशस्वी ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अफगाणिस्तानचा संघ : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), सेदीकुल्लाह अटल, इब्राहिम झदरन, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गझनफर, फझलहक फारुकी
हॉगकॉगचा संघ : झीशान अली (विकेटकिपर), बाबर हयात, अंशुमन रथ, कल्हान छल्लू, निजाकत खान, एजाज खान, किंचित शाह, यासीम मुर्तझा (कर्णधार), आयुष शुक्ला, अतीक इक्बाल, एहसान खान