पहिल्या क्वार्टरमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये, पहिले मनप्रीत सिंग (17 व्या मिनिटाला), सुखजीत सिंग (19 व्या मिनिटाला), शिलानंद लाक्रा (24 व्या मिनिटाला) आणि नंतर विवेक सागर प्रसाद (38 व्या मिनिटाला) यांनी भारतीय टीमसाठी गोल केले. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गोल करून मलेशियाने आघाडी घेतली. शनिवारी सुपर 4 च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना चीनशी होईल.
advertisement
मलेशियाविरुद्धच्या विजयासह भारत दोन सामन्यांमध्ये चार पॉईंट्ससह सुपर 4 टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारतीय टीम चीन आणि मलेशियापेक्षा पुढे आहे, ज्यांचे प्रत्येकी तीन गुण आहेत तर गतविजेता कोरिया फक्त एका गुणासह शेवटच्या स्थानावर आहे. टीम इंडिया शुक्रवारच्या ब्रेकनंतर शनिवारी त्यांचा शेवटचा सुपर-4 सामना चीनविरुद्ध खेळेल तर मलेशिया कोरियाशी सामना करेल. रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला चीनविरुद्धची मॅच ड्रॉ केली तरी प्रवेश मिळणार आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यात मलेशियाला त्यांच्या दोन प्रमुख खेळाडूंशिवाय मैदानात उतरावं लागलं. मागच्या सामन्यात चीनच्या खेळाडूंसोबत झालेल्या वादानंतर मलेशियाच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना भारताविरुद्धच्या सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं होतं.