TRENDING:

'तुम्हालाच टीम मेसेज करतो...', पत्रकाराला एकाच खेळाडूची चिंता, कॅप्टन सूर्या सगळ्यांसमोर भडकला!

Last Updated:

आशिया कप 2025 ला आजपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे, तर टीम इंडियाची पहिली मॅच बुधवारी युएईविरुद्ध होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुबई : आशिया कप 2025 ला आजपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे, तर टीम इंडियाची पहिली मॅच बुधवारी युएईविरुद्ध होणार आहे, पण चाहत्यांचं लक्ष रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागलं आहे. भारत-पाकिस्तानच्या या सामन्यावर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यात आपण टीमच्या आक्रमकतेवर अंकुश लावणार नाही, कारण हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा महत्त्वाचा पैलू आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
'तुम्हालाच टीम मेसेज करतो...', पत्रकाराला एकाच खेळाडूची चिंता, कॅप्टन सूर्या सगळ्यांसमोर भडकला!
'तुम्हालाच टीम मेसेज करतो...', पत्रकाराला एकाच खेळाडूची चिंता, कॅप्टन सूर्या सगळ्यांसमोर भडकला!
advertisement

दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली यानेही आपणही पाकिस्तानी खेळाडूंना मागे हटण्याचे आदेश देणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. रविवारी होणाऱ्या पाकिस्तानच्या मॅचआधी भारताला बुधवारी युएईविरुद्ध खेळायचं आहे.

आशिया कपच्या पहिल्या सामन्याआधी सर्व टीमच्या कर्णधारांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवला भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. 'मैदानामध्ये कायमच आक्रमकता असते. आक्रमकतेशिवाय आम्ही खेळू शकत नाही. मी आक्रमकतेसह मैदानात उतरण्यासाठी उत्साही आहे', असं उत्तर सूर्यकुमार यादवने दिलं.

advertisement

या वर्षाच्या सुरूवातीला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सीमेवर तणाव वाढला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातला हा पहिला सामना आहे.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली यानेही जर कुणाला आक्रमक व्हायचं असेल तर तो होऊ शकतो. कोणत्याही खेळाडूला काही सांगण्याची गरज नाही, कारण प्रत्येकजण वेगळा असतो. फास्ट बॉलर कायमच आक्रमक असतात, असं उत्तर दिलं आहे. आशिया कपच्या ट्रॉफीचं अनावरण केल्यानंतर सर्व 8 टीमच्या कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये सूर्यकुमार यादव आणि सलमान अली एकमेकांच्या शेजारी बसले नव्हते. या दोघांच्याही मध्ये अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान होता.

advertisement

टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोण?

सूर्यकुमार यादवला पहिल्या सामन्यात कोणते बदल अपेक्षित आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सूर्याने तुम्ही मला उचकवण्याचा प्रयत्न करत आहात, असं म्हणत उत्तर देणं टाळलं. 'कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत असताना तुमची तयारी किती चांगली आहे? हे जाणणं महत्त्वाचं आहे. गरज नसताना प्रयोग करण्याची गरज काय? जर निकाल आमच्या बाजूने लागत असतील तर बदल का करायचे?', असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.

advertisement

पूर्ण टीम मेसेज करतो

पहिल्या सामन्यात संजूला संधी मिळणार का जितेश शर्माला? असा थेट प्रश्न केरळच्या पत्रकाराने सूर्याला विचारला, तेव्हा त्यानेही मजेशीर उत्तर दिलं. मी तुम्हाला पूर्ण टीम मेसेज करतो, सर. आम्ही त्याची पूर्ण काळजी घेत आहोत. तुम्ही चिंता करू नका, उद्या आम्ही योग्य निर्णय घेऊ, असा टोला सूर्यकुमार यादवने लगावला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'तुम्हालाच टीम मेसेज करतो...', पत्रकाराला एकाच खेळाडूची चिंता, कॅप्टन सूर्या सगळ्यांसमोर भडकला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल