आशिया कपमध्ये एकूण 8 टीम सहभागी झाल्या आहेत. या 8 टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान या टीम आहेत. तर ग्रुप बी मध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका, हाँगकाँग आणि बांगलादेश आहेत, त्यामुळे ग्रुप बी ला ग्रुप ऑफ डेथ म्हणूनही बोललं जात आहे.
आशिया कपमध्ये भारतासाठी श्रीलंकेची टीम मोठा धोका ठरू शकते. आशिया कपच्या इतिहासामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात 23 मॅच झाल्या आहेत, यापैकी 12 सामन्यांमध्ये भारताचा आणि 11 सामन्यांमध्ये श्रीलंकेचा विजय झाला आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये श्रीलंकेच्या टीमचा मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या आहे, त्यामुळे त्याच्या अनुभवाचाही त्यांना फायदा होऊ शकतो. श्रीलंकेची टीम भारताच्या ग्रुपमध्ये नसल्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात थेट सुपर-4 मध्येच सामना होण्याची शक्यता आहे.
advertisement
आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध 10 मॅच जिंकल्या आहेत, तर 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाने 13 मॅच जिंकल्या आणि 2 सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाचे सामने युएई, पाकिस्तान आणि ओमानविरुद्ध होणार आहेत.
आशिया कपसाठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षीत राणा, रिंकू सिंग