मिस्ट्री स्पिनग गोलंदाज वरुण चक्रवर्तीने आयसीसीच्या ताज्या टी20 क्रमवारीत मोठा धमाका केला आहे. वरूण चक्रवर्ती त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर आयसीसीच्या पुरुष टी20च्या गोलंदाजी क्रमवारीत नंबर 1चा गोलंदाज बनला आहे.त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज बनला आहे.
34 वर्षीय वरूण चक्रवर्तीला आशिया कपमध्ये केलेल्या कामगिरीचा मोठा फायदा मिळाला आहे. वरुण चक्रवर्तीने युएईविरुद्ध दोन ओव्हरमध्ये फक्त 4 धावा देऊन 1 विकेट घेतली.तर पाकिस्तान विरूद्ध चार ओव्हर गोलंदाजी करून 24 धावा देत 1 विकेट काढली आहे.या कामगिरीमुळे त्याने तीन स्थानांची झेप घते नंबर 1चं स्थान काबीज केलं आहे.
advertisement
वरूण चक्रवर्तीचे मागील सर्वोत्तम स्थान फेब्रुवारी 2025 मध्ये होते. जेव्हा तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. यावेळी त्याने न्यूझीलंडच्या जेकब डफीला मागे टाकले आणि आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले. मार्चपासून या रँकिंगमध्ये जेकब डफी पहिल्या क्रमांकावर होता, परंतु आता चक्रवर्तीने त्याच्या क्षमतेने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की भारतीय फिरकी गोलंदाजांची ताकद अजूनही उंच आहे.
दरम्यान टीम इंडियाने आशिया कपसाठी निवडलेले इतर गोलंदाज देखील दुसऱ्या फॉरमॅटमध्ये चांगल्या स्थानी आहेत.जसप्रीत बुमराह टेस्ट फॉरमॅटमध्ये 889 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर वनडेमध्ये कुलदीप यादव 650 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.त्यानंतर आता वरूण चक्रवर्ती टी20 फॉरमॅटमध्ये 733 गुणांसह अव्वल स्थानी आहे.त्यामुळे टीम इंडियाचे हे तीनही गोलंदाज आयसीसी क्रमवारीत चांगल्या स्थानी आहे.याचाच टीम इंडिआला आशिया कपमध्ये फायदा होत आहे.त्यामुळे टीम इंडियाच्या या गोलंदाजाची तिकडी पाहता त्यांना आशिया कप जिंकण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.
अभिषेक शर्मा पहिल्या स्थानी कायम
आशिया कप 2025 मध्ये भारताचा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माने शानदार कामगिरी करून फलंदाजी क्रमवारीत आपली पकड मजबूत केली आहे. त्याने यूएईविरुद्ध 16 चेंडूत 30 धावा आणि पाकिस्तानविरुद्ध 13 चेंडूत 31 धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता अभिषेक शर्माशिवाय अव्वल १० मध्ये ३ भारतीय फलंदाज आहेत. तिलक वर्मा २ स्थानांनी घसरून चौथ्या क्रमांकावर आला आहे आणि सूर्यकुमार यादव एक स्थान घसरून सातव्या क्रमांकावर आला आहे.
या शानदार कामगिरीच्या आधारे अभिषेकने एकूण 55 रेटिंग गुण जोडले आहेत आणि आता त्याचे एकूण रेटिंग गुण 884 झाले आहेत. या उत्तम फॉर्मसह, तो फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.