भोपाळमध्ये राहणारा समय श्रीवास्तव 5 वर्षांपूर्वी भारत सोडून ओमानला गेला. ओमानमध्ये जाऊन समय क्रिकेट खेळला आणि काही वर्षांमध्येच त्याला ओमानकडून खेळण्याची संधी मिळाली. आशिया कप 2025 साठी समयची निवड ओमानच्या टीममध्ये झाली आहे. समय काही वर्षांपूर्वी ज्या टीम इंडियाकडून खेळण्याचं स्वप्न बघत होता, आता त्याच टीमच्याविरोधात त्याला मैदानात उतरावं लागणार आहे. भारतामध्ये असताना समय विजय हजारे ट्रॉफीसह वेगेवेगळ्या एज ग्रुप क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळला.
advertisement
आशिया कप 2025 मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. भारत आणि ओमान यांच्यात 19 सप्टेंबरला सामना होणार आहे.
समय श्रीवास्तवचं करिअर
34 वर्षांचा समय श्रीवास्तव याने आतापर्यंत ओमानसाठी 12 वनडे मॅच खेळल्या आहेत. स्पिन बॉलर असलेल्या समयने या सामन्यांमध्ये 25 विकेट घेतल्या, याशिवाय 15 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 15 विकेट घेतल्या. समयने ओमानकडून शेवटचा सामना मे 2025 मध्ये खेळला होता, ज्यात त्याने 1 विकेट घेतली आणि तो 5 रनवर नाबाद राहिला.