संजूचा फॉर्म चिंतेचा विषय
आशिया कपआधी संजू सॅमसन भारताकडून टी-20 फॉरमॅटमध्ये अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला यायचा, पण शुभमन गिलचं भारतीय टीममध्ये पुनरागमन झाल्यामुळे संजूला खालच्या क्रमांकावर बॅटिंग करावी लागत आहे. आशिया कपमधल्या 4 सामन्यांपैकी युएई आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संजूला बॅटिंगची संधी मिळाली नाही. तर ओमानविरुद्ध संजूने फक्त 124 च्या स्ट्राईक रेटने 45 बॉलमध्ये 56 रन केले. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 च्या सामन्यातही संजू संघर्ष करताना दिसला. 17 बॉलमध्ये 13 रन करून तो माघारी परतला.
advertisement
जितेश शर्माला संधी मिळणार?
आशिया कपमध्ये भारताचा पुढचा सामना बुधवारी बांगलादेशविरुद्ध होत आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव संजू सॅमसनऐवजी जितेश शर्माला संधी देऊ शकतो. जितेश शर्मा हा आयपीएलमध्येही लोअर मिडल ऑर्डरमध्ये खेळतो, त्यामुळे त्याला या क्रमांकावर खेळण्याचा अनुभव आहे. तसंच तो शेवटच्या काही ओव्हरमध्ये विरोधी टीमच्या बॉलिंगवर पहिल्या बॉलपासूनच आक्रमण करू शकतो. दुसरीकडे संजू हा ओपनर असल्यामुळे त्याला खालच्या क्रमांकावर बॅटिंग करताना संघर्ष करावा लागत असल्याचं दिसत आहे, त्यामुळे टीम इंडिया पुढच्या सामन्यात जितेश शर्माचा विचार करू शकते.
भारतीय टीम
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षीत राणा, अर्शदीप सिंग