जोश टंगच्या 5 विकेट्स
मॅचच्या सुरुवातीला इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे सार्थ ठरला. ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 45.2 ओव्हरमध्ये 152 रन्सवर आटोपली. सलामीवीर उस्मान ख्वाजाने 29 रन्स केले, तर स्टीव्ह स्मिथ केवळ 9 रन्सवर जोश टंगच्या बॉलवर बोल्ड झाला. या बॉलवर स्मिथ पूर्णपणे गोंधळलेला दिसला. ऑस्ट्रेलियाचे शेवटचे तीन विकेट्स तर एकही रन न जोडता पडले. इंग्लंडच्या जोश टंगने अप्रतिम कामगिरी करत 5 विकेट्स घेतल्या, तर गस ॲटकिन्सनने 2 दोन महत्त्वाच्या विकेट्स नावावर केल्या.
advertisement
पाहा 20 विकेट्स कशा पडल्या?
प्रत्युत्तरादाखल बॅटिंगसाठी उतरलेल्या इंग्लंडची अवस्था ऑस्ट्रेलियापेक्षाही वाईट झाली. अवघ्या 16 रन्सवर इंग्लंडने 4 महत्त्वाचे बॅट्समन गमावले होते, ज्यात जो रूट शून्यावर बाद झाला. हॅरी ब्रूकने 34 बॉल्समध्ये 41 रन्सची धडाकेबाज खेळी करत थोडा प्रतिकार केला, पण मायकेल नेसरच्या 4 विकेट्स आणि स्कॉट बोलंडच्या 3 विकेट्समुळे इंग्लंडचा डाव 29.5 ओव्हरमध्ये 110 रन्सवर आटोपला. अशा प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला 42 रन्सची महत्त्वाची आघाडी मिळाली आहे.
पाहा मॅचची Highlights
टोपी उंचावून अनोखी श्रद्धांजली
या मॅचमध्ये दुपारी 3 वाजून 50 वाजता एक भावूक क्षणही पाहायला मिळाला. दिवंगत दिग्गज शेन वॉर्न यांचा टेस्ट कॅप नंबर 350 असल्याने, चाहत्यांनी आपल्या टोपी उंचावून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये 1 ओव्हरमध्ये बिनबाद 4 रन्स केले असून ट्रॅविस हेड आणि स्कॉट बोलंड नाबाद आहेत. शनिवारी सकाळी 5 वाजता मॅच पुन्हा सुरू होईल, तेव्हा ऑस्ट्रेलिया ही जिंकणार की इंग्लंड पुन्हा बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, स्कॉट बोलँड.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), विल जॅक्स, गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोश टंग.
