दुपारी 3:50 वाजता काय घडलं?
दुपारी 3:50 वाजता संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षकांनी आपल्या जागेवर उभे राहून डोक्यावरील टोपी काढून उंचावली. ही वेळ निवण्यामागे एक खास कारण होते. ऑस्ट्रेलियाचे दिवंगत दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न यांचा टेस्ट कॅप नंबर 350 हा होता. आपल्या लाडक्या 'वॉर्नी'च्या याच ट्रेडमार्क स्टाईलची आठवण म्हणून चाहत्यांनी 'टिपिंग देअर हॅट्स' (Tipping their hats) करत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.
advertisement
700 विकेट्स पूर्ण केल्या
2006 मध्ये याच बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यात वॉर्नने या फॉरमॅटमध्ये 700 विकेट्स पूर्ण केल्या. वॉर्न कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला. 2006 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी मेलबर्न येथे सुरू झाला. या कसोटीपूर्वी शेन वॉर्नने 699 बळी घेतले होते. त्यावेळी त्याने 700 विकेट्स पूर्ण केले अन् रेकॉर्ड रचला होता. अशातच याच बॉक्सिंग डे टेस्टमध्ये शेन वॉर्नला मानवंदना देण्यात आली आहे.
शेन वॉर्नचा मृत्यू कसा झाला?
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर त्याच्या व्हिलामधून एक वस्तू काढून टाकण्यात आली. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये मृतावस्थेत आढळला होता. डेली मेलच्या वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला कामाग्रा नावाच्या औषधाची बाटली काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते.
