TRENDING:

IND vs AUS : टीम इंडियाने 120 बॉलमध्येच मॅच हारली, कॅप्टन एकटीच पुरुन उरली, ऑस्ट्रेलियाकडून लाजिरवाणा पराभव

Last Updated:

टीम इंडिया बॅटींग करण्याआधीच सामना हारली आहे.कारण त्या 120 बॉलनेच सामन्याचा निकाल फिरवला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India w vs Australia W : टीम इंडिया टी20 वर्ल्डकपमध्ये व्यस्त असताना तिकडे ओवलच्या मैदानाता ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. या सामन्यात टीम इंडिया बॅटींग करण्याआधीच सामना हारली आहे.कारण त्या 120 बॉलनेच सामन्याचा निकाल फिरवला होता.दरम्यान या सामन्यात भारताचा 185 धावांनी पराभव कसा झाला हे जाणून घेऊयात.
australia women defeat team india
australia women defeat team india
advertisement

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 407 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात खूपच खराब झाली होती. कारण टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मानधना शून्य धावावर बाद झाली होती.त्याच्यानंतर प्रतिका रावल आणि जेमीमा रॉड्रीग्जने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रतिका रावल 27 वर बाद झाली.त्यानंतर जेमीमा 42 धावा करून बाद झाली. कॅप्टन हरमनप्रीत कौर मैदानात आली होती. पण ती देखील मैदानात फार काळ टीकू शकली नाही आणि तो 25 वर बाद झाली.

advertisement

हरमनप्रीत कौर बाद होताच विकेटची लाईन लागली. हरलीन देओल 14, दिप्ती शर्मा 29, रिचा घोष 18, काश्वी गौतम शून्य धावावर बाद झाली. स्नेहा राणाने एकटीने लढा देण्याचा प्रयत्न केला.पण 44 धावात ती बाद झाली. त्यानंतर श्री चरणी बाज होताच टीम इंडियाचा डाव 224 धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारताचा 185 धावांनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाकडून अलान किंगने 4, जॉर्जिया वेरेहाम 2, निकोला कॅरी, अॅनाबेल सुथरलँड, अॅश्ले गार्डनर प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

advertisement

ऑस्ट्रेलियाकडून अॅलिसा हिलीने सर्वाधिक 98 बॉलमध्ये 158 धावांची दिड शतकीय खेळी केली होती. तिच्यासोबत बेथ मुनीने 106 धावांची शतकीय खेळी केली. या बळावर ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 409 धावा केल्या होत्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उसात केली कोबीची शेती, शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार लाखात, कसा केला यशस्वी प्रयोग?
सर्व पहा

या सामन्यात भारताकडून श्री चरणी आणि स्नेह राणाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. रेणुका सिंह ठाकूर, केश्वी गौतम आणि दिप्ती शर्माने 1 विकेट घेतली होती. विशेष म्हणजे श्री चरणीने आपल्या 10 ओव्हरच्या स्पेलमध्ये 106 धावा तर केश्वी गौतमने 83 अशा एकूण 189 धावा दिल्या होत्या. आणि भारताचा पराभव देखील 185 धावांनी झाला आहे.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या 20 ओव्हर म्हणजेच 120 बॉलमध्ये मॅच फिरली होती.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : टीम इंडियाने 120 बॉलमध्येच मॅच हारली, कॅप्टन एकटीच पुरुन उरली, ऑस्ट्रेलियाकडून लाजिरवाणा पराभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल