TRENDING:

क्रिकेट वर्तुळात शोककळा! दिग्गज अचानक मैदान कोसळला, रूग्णालयात मृत घोषित,नेमकं काय घडलं?

Last Updated:

नवीन वर्षाचा उत्साह असताना तिकडे क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.दिग्गज मैदानावर असताना अचानक तो जमिनीवर कोसळतो.त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येते. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नवीन वर्षाचा उत्साह असताना तिकडे क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.दिग्गज मैदानावर असताना अचानक तो जमिनीवर कोसळतो.त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येते. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले होते.त्यामुळे या घटनेने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.
bangladesh
bangladesh
advertisement

बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल) सामन्यापूर्वी शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये ढाका कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली यांचे निधन झाले.

राजशाही वॉरियर्स विरुद्ध संघाच्या पहिल्या सामन्याच्या काही मिनिटांपूर्वीच झाकी मैदानावर कोसळले होते.

ही घटना पाहताच संघातील कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) केले. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने अल हरमैन रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. बीसीबीचे मुख्य चिकित्सक देबाशिष चौधरी यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली.

advertisement

या अचानक घडलेल्या घटनेने स्टेडियममधील सर्वांनाच धक्का बसला. ढाका संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की घटनेपूर्वी झाकीने कोणत्याही आरोग्य समस्येची तक्रार केली नव्हती. ढाका कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली झाकी स्टेडियममध्ये कोसळल्याची बातमी पसरताच, शनिवारी अनेक बीपीएल संघांचे खेळाडू सिल्हेटमधील रुग्णालयात दाखल झाले होते.

अल हरमैन रुग्णालयात पोहोचलेल्यांमध्ये सिल्हेट टायटन्स, नोआखाली एक्सप्रेस आणि चट्टोग्राम रॉयल्सचे खेळाडू होते. २०१६ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान (भारत) तस्किन अहमद यांच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यानंतर झाकी त्याच्यासोबत काम करत असताना तो चर्चेत आला होता.

advertisement

बोर्डाच्या निवेदनात काय?

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "बीसीबी गेम डेव्हलपमेंटचे स्पेशलिस्ट पेस बॉलिंग कोच महबूब अली झाकी यांच्या निधनाबद्दल बांगलादेश क्रिकेट बोर्डाला तीव्र दुःख आहे. त्यांचे आज सिल्हेट येथे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

माजी वेगवान गोलंदाज, झाकी यांनी राष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये कोमिल्ला जिल्ह्याचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले. त्यांनी ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमध्येही भाग घेतला आणि अबहानी आणि धनमोंडी सारख्या शीर्ष क्लबसाठी खेळले. त्यांच्या खेळण्याच्या कारकिर्दीनंतर, महबूब अली झाकी यांनी स्वतःला प्रशिक्षण आणि खेळाडू विकासासाठी समर्पित केले. ते 2008 मध्ये बीसीबीमध्ये उच्च कामगिरी प्रशिक्षक म्हणून सामील झाले आणि देशात वेगवान गोलंदाजीच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
क्रिकेट वर्तुळात शोककळा! दिग्गज अचानक मैदान कोसळला, रूग्णालयात मृत घोषित,नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल