51 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर
आयसीसीने विश्वचषक विजेत्या संघासाठी 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम निश्चित केली होती, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 39.78 कोटी रुपये इतकी आहे. तर आता दुसरीकडे बीसीसीआयने त्याहून मोठी रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघासाठी 51 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही रक्क्म पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बजेटपेक्षा जास्त आहे.
advertisement
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले...
1983 मध्ये कपिल देव यांनी भारताला विश्वचषक जिंकून देऊन क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची आणि प्रेरणाची सुरुवात केली. आज महिलांनीही तोच उत्साह आणि प्रेरणा आणली आहे. हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने आज केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर सर्व भारतीयांची मने जिंकली आहेत, असं सैकिया म्हणाले. बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी - खेळाडू, प्रशिक्षकांसाठी 51 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आम्ही संघ आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करत आहोत, असंही त्यांनी घोषित केलं.
आयसीसीकडून तब्बल 4.48 दशलक्ष डॉलर्सच बक्षिस
वर्ल्ड कपची फायनल जिंकणाऱ्या भारतीय संघाला तब्बल 4.48 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 40 कोटी) मिळणार आहेत. ही रक्कम ऑस्ट्रेलियाच्या 2022 च्या बक्षीस रकमेपेक्षा 239 टक्के जास्त आहे. वर्ल्ड कपमध्ये उपविजेत्या ठरलेल्या साऊथ आफ्रिकेला 2.24 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 20 कोटी) मिळतील. ही रक्कम इंग्लंडच्या 2022 च्या बक्षीस रकमेपेक्षा 273 टक्के जास्त आहे.
दरम्यान, आयसीसीने जाहीर केलेल्या बक्षिसाच्या रक्कमेनुसार, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांना 1.12 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 9.3 कोटी) इतकी समान रक्कम मिळाली आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना 700,000 डॉलर्स (अंदाजे 5.8कोटी) इतकी समान रक्कम मिळाली.
