टीम इंडियाची डोकेदुखी
साऊथ अफ्रिकाविरुद्ध न्यूझीलंडने अफलातून गोलंदाजी करत विजय मिळला. या विजयात स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची होती. कॅप्टन मिचेल सँटनर आणि रचिन रविंद्र या दोन लेफ्ट हँडर फिरकीपटूंनी साऊथ अफ्रिकेच्या फलंदाजांना नाचवलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला देखील सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. मिचेल सँटनर आणि रचिन रविंद्र या दोघांना खेळण्यासाठी टीम इंडियाच्या बॅटिंग लाईनअपमध्ये एकच खेळाडू आहे, तो म्हणजे अक्षर पटेल.. अक्षर थेट सहाव्या क्रमांकावर येतो, त्यामुळे टॉप ऑर्डरमध्ये एकही लेफ्टी फलंदाज नाहीये. अशातच सँटनर आणि रचिन टांगा पलटी करू शकतात.
advertisement
रोहितने आखला मास्टरप्लॅन
मिचेल सँटनर आणि रचिन रविंद्र यांना तोड देण्यासाठी रोहित शर्मा हुकमी एक्का मैदानात उतरवू शकतो. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऋषभ पंत आहे. ऋषभ पंत याला यंदाच्या चॅम्पिन्स ट्रॉफीमध्ये एकदाही मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. अशातच आता केएल राहुलच्या जागी ऋषभ पंत याला मैदानात उतरवणार का? असा सवाल विचारला जात आहे. पण केएल राहुल या फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूला बसवणं कितपत योग्य असेल? यावर देखील विचार रोहितला गंभीररित्या करावा लागेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.