वनडे क्रिकेट खेळायचं असेल तर...
बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, जर रोहित आणि कोहली यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरही वनडे क्रिकेट खेळायचे असेल, तर त्यांना डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपापल्या राज्यांच्या संघाकडून खेळावे लागेल. याआधी रणजी ट्रॉफीमध्ये खराब कामगिरीनंतर दोन्ही खेळाडूंनी कसोटीतून निवृत्ती घेतली होती. यामुळेच, हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वृत्त दैनिक जागरणने दिलं आहे.
advertisement
वर्ल्ड कपच्या रणनितीमध्ये अनफिट
टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीने 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी युवा खेळाडूंना तयार करण्याची योजना आखली आहे. एका सूत्राने दैनिक जागरणला सांगितलं की, "रोहित आणि कोहली हे आगामी वर्ल्ड कपच्या आमच्या रणनितीमध्ये बसत नाहीत." या दोन्ही खेळाडूंनी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी-20 फॉरमॅटमधून आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम?
दरम्यान, रोहित आणि विराट यांचं वय पाहता, या टप्प्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता खूपच कमी दिसते. भारताचा पुढील एकदिवसीय सामना ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असल्याने, या मालिकेत या प्रतिष्ठित जोडीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. तर आता वनडे टीमचा कॅप्टन देखील बदलणार का? असा सवाल विचारला जातोय.