आशियाई क्रिकेट असोशिएशनला पत्र
देवजित सैकिया यांनी सांगितलं की, "आम्ही दहा दिवसांपूर्वी आशियाई क्रिकेट असोशिएशनला पत्र पाठवलं होतं, पण त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही याच भूमिकेवर ठाम आहोत." भारत ही स्पर्धा जिंकल्याने ट्रॉफी निश्चितपणे येईल, परंतु ती मोहसीन नकवी यांच्या हातून स्वीकारणार नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
advertisement
ट्रॉफी स्वीकारायची असती, तर...
"जर आम्हाला त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायची असती, तर आम्ही ती फायनलच्या दिवशीच घेतली असती. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे की, आम्ही त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही," असं देवजित सैकिया म्हणाले आहेत.
टाइमलाइन निश्चित केली
दरम्यान, 4 नोव्हेंबरपासून दुबईत सुरू होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल आणि ट्रॉफी भारतात आणण्यासाठी योग्य टाइमलाइन निश्चित केली जाईल, असंही देवजित यांनी सांगितलं.
