काय म्हणाले नितीश कुमार?
आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला बिहारचा वैभव सूर्यवंशी याचं अभिनंदन आणि शुभेच्छा... त्याच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेमुळे तो भारतीय क्रिकेटसाठी एक नवीन आशा बनला आहे. सर्वांना त्याचा अभिमान आहे, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.
नितीश कुमारांचा वैभवला फोन
advertisement
मी 2024 मध्ये वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या वडिलांना भेटलो होतो आणि त्यावेळी मी त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आयपीएलमधील त्याच्या चमकदार कामगिरीनंतर मी त्याचं फोनवरून अभिनंदनही केलं. बिहारमधील तरुण क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीलाही राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. वैभव भविष्यात भारतीय संघासाठी नवीन विक्रम रचेल आणि देशाला गौरव देईल अशी माझी इच्छा आहे, असंही नितीश कुमार म्हणाले.
लिलावात 1.1 कोटींची किंमत
दरम्यान, वैभव सुर्यवंशीला राजस्थान रॉयल्स (RR) ने आयपीएल 2025 च्या लिलावात 1.1 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्याची आधारभूत किंमत लिलावात 30 लाख होती. वैभवला आपल्या संघात घेण्यासाठी राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससोबत जोरदार बोली लावली आणि अखेरीस 13 वर्षीय या वादळी युवा खेळाडूला आपल्या बाजूने केलं होती. अशातच आता वैभवला संघात घेण्याचा राहुल द्रविडचा निर्णय योग्य ठरत असल्याचं पहायला मिळतंय.