सुंदरच्या बरगड्यांना दुखापत
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिज दरम्यान सुंदरच्या बरगड्यांना दुखापत झाली होती, ज्यामुळे तो सध्या क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. मात्र, टी20 वर्ल्ड कपसाठी त्याची आधीच टीममध्ये निवड झाली असून अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या मॅचपर्यंत तो फिट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सूर्यकुमार नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या.
advertisement
तिलक वर्माचं उदाहरण दिलं
सूर्याने कॅप्टन्सच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुंदरच्या रिकव्हरीबद्दल सांगताना तिलक वर्माचे उदाहरण दिलं. तिलक वर्मा याला विश्रांती मिळाली होती. तो न्यूझीलंड मालिकेत खेळला नाही आणि जेव्हा तो परतला तेव्हा तो पूर्णपणे वेगळ्या खेळाडूसारखा दिसत होता. त्याने अ मालिकेत (भारत अ आणि अमेरिका यांच्यातील सराव सामना) एक सामना खेळला आणि काल (बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात) देखील खेळला, असं सूर्यकुमार म्हणाला.
100 टक्के आम्ही धीर धरू - सूर्यकुमार यादव
आम्हाला आशा आहे की, वॉशिंग्टन सुंदरने देखील तिलक वर्माप्रकारे कमबॅक करेल. तो खूप चांगली कामगिरी करत आहे. तो जवळजवळ तयार आहे. तो परतल्यावर तो पूर्णपणे तंदुरुस्त असावा अशी आमची इच्छा आहे. 100 टक्के आम्ही त्याच्यासाठी धीर धरू, असं कॅप्टन सूर्यकुमार यादव म्हणाला आहे, असं सूर्यकुमार यादव याने म्हटलं आहे.
विमानाचं तिकीट बुक झालंय
दरम्यान, 15 फेब्रुवारीसाठी कोलंबोचं आमचं विमानाच तिकीट बुक झालं आहे, आम्ही तिकडे जाऊ आणि पाहू काय होतंय, असं सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कपआधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगून टाकलं. सूर्यकुमार यादवच्या या विधानानंतर पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगाने प्रतिक्रिया दिली आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध सामना न खेळणे हा पूर्णपणे पाकिस्तान सरकारचा निर्णय असल्याचे आगाने सांगितले आहे.
