TRENDING:

IPL 2026 : पहिल्याच सामन्यात ऋतुराजकडून घोडचूक! 14.20 कोटीच्या प्लेयरला लपवून ठेवलं, जडेजापेक्षाही घातक ऑलराऊंडर

Last Updated:

IPL 2026, CSK vs RR : पहिल्या 20 मिनिटातच चेन्नईने घोडचूक केली. चेन्नईने सरफराज खान याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून पाठवलं. ज्यामुळे दुसऱ्या ईनिंगमध्ये त्यांना बॉलर्सची कमतरता जाणवली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Captain Ruturaj gaikwad Big Mistake : आयपीएल 2026 च्या पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सला (CSK vs RR) राजस्थान रॉयल्सविरुद्ध लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर झालेला हा खेळ पाहून चाहत्यांना पुन्हा धोनीची आठवण येऊ लागलीये. दिग्गज खेळाडूंची फौज असूनही चेन्नई सुपर किंग्जची पूर्ण टीम केवळ 127 रन्सवर ढेपाळली आणि राजस्थानने अवघ्या 12.1 ओव्हरमध्येच मॅच नावावर केली. त्यामुळे आता चेन्नईच्या कॅप्टनवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतीयेत.
CSK Captain ruturaj gaikwad Big Mistake
CSK Captain ruturaj gaikwad Big Mistake
advertisement

20 मिनिटातच चेन्नईची घोडचूक

पहिल्या 20 मिनिटातच चेन्नईने घोडचूक केली. चेन्नईने सरफराज खान याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून पाठवलं. ज्यामुळे दुसऱ्या ईनिंगमध्ये त्यांना बॉलर्सची कमतरता जाणवली. सरफराज खानच्या जागी तर 14.20 कोटींमध्ये खरेदी केलेला ऑलराऊंडर असता तर चेन्नईला बॅटिंगमध्ये आणि नंतर बॉलिंगमध्ये देखील याचा फायदा झाला असता. पण ऋतुराजने घोडचूक केली. पण कोण आहे हा 14.20 कोटीचा खेळाडू? ज्याला चेन्नईने लपवूनच ठेवलंय.

advertisement

CSK vs RR : पावरप्ले नाही तर 8 च्या ओव्हरमध्ये CSK च्या हातातून निसटली मॅच, पहिल्या 20 मिनिटात चेन्नईचा गेम!

ऑक्शनमध्ये 14.20 कोटींना खरेदी

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून प्रशांत वीर आहे. प्रशांत वीर याला यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये 14.20 कोटींना खरेदी केलं होतं. धोनीचा हा मास्टर स्ट्रोक मानला जात होता. मात्र, चेन्नईने आपले दोन्ही 14 कोटींचे प्लेयर एकत्र मैदानात उतरवले नाहीत. प्रशांत वीर हा डावखुरा फलंदाज असून स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलिंग करतो. त्याची शैली आणि मैदानावरील वावर हुबेहूब रवींद्र जडेजासारखाच आहे.

advertisement

Ravindra Jadeja : ट्रॉफी जिंकून दिली त्याच CSK विरुद्ध खेळताना जडेजा भावुक, डोळ्यात पाणी अन्... पाहा Video

कोण आहे प्रशांत वीर?

जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये ट्रेड झाल्यानंतर, त्याची जागा भरून काढण्यासाठी चेन्नईने प्रशांतवर एवढा मोठा विश्वास दाखवला आहे. प्रशांत वीरने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मधील 7 मॅचेसमध्ये 169.19 च्या स्ट्राइक रेटने 112 रन्स आणि 9 विकेट्स नावावर केल्या होत्या. तसेच युपी T20 लीग 2025 तो 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन' ठरला होता.

advertisement

शेवटच्या ओव्हर्समध्ये सिक्स मारण्याची ताकद

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

प्रशांत वीरकडे शेवटच्या ओव्हर्समध्ये सिक्स मारण्याची ताकद आहे आणि जो अचूक बॉलिंग करून विकेट्स काढू शकतो, अशा 'मॅच विनर'ला मॅचमधून बाहेर का ठेवले? कालच्या मॅचमध्ये जेव्हा CSK ची बॅटिंग कोसळत होती, तेव्हा प्रशांत वीरसारखा बॅट्समन टीमला सावरू शकला असता. आता पुढच्या मॅचमध्ये तरी या 14 करोडच्या खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : पहिल्याच सामन्यात ऋतुराजकडून घोडचूक! 14.20 कोटीच्या प्लेयरला लपवून ठेवलं, जडेजापेक्षाही घातक ऑलराऊंडर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल