सारा तेंडुलकरने अंधेरीमध्ये पिलेटस अकॅडमी म्हणजेच फिटनेस स्टुडीओ उघडलं आहे. या पिलेटस अकॅडमीला टीम इंडियाची वर्ल्ड कप विजेती खेळाडू दीप्ती शर्माने नुकतीच हजेरी लावली होती. या दरम्यानचा व्हिडिओच आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सारा तेंडुलकर आणि दीप्ती शर्मा या गप्पा मारताना दिसत आहेत.
सारा तेंडुलकरच्या या फिटनेस अॅकडमीमध्ये दीप्ती शर्मा आणि ती वर्कआऊट करताना दिसत आहे. या वर्कआऊट दरम्यान दोघांमध्ये एक चॅलेंज लागतं. या चॅलेंज दरम्यान सारा तेंडुलकर म्हणते, माझ्यासाठी थोड सोप्प असलं पाहिजे,कारण तुम्ही काही करून जिंकालच.पण दिप्ती यावर म्हणते मी तुम्हाला जिंकून देते, त्यानंतक दोघीही हसायला लागतात.
मला वडापाव खूप आवडतो, पाणी पुरी इतकी नाही आवडत, पण हा कॉन्ट्रोवर्शियल सल्ला आहे, पण मला नाही आवडत,असे सारा तेंडुलकर म्हणते.त्यामुळे सारा तेंडुलकर पाणीपुरीच्या सल्ल्याला कॉन्ट्रोवर्शियल म्हणते आहे. तसेच दीप्ती व्हिडिओच्या शेवटी सारा तेंडुलकरला विचारते, हे तुझं फेव्हरेट वर्कआऊट आहे का? यावर सारा म्हणते मला कार्डिओ आवडत नाही, तुला बेड लंचेस आवडतात असे शेवटी दीप्ती शर्मा म्हणते.
दरम्यान 13 ऑगस्टला सारा तेंडुलकरच्या अंधेरीतील पिलेटस अकॅडमी म्हणजेच फिटनेस स्टुडीओचं उद्धाटन पार पाडलं होतं.या उद्घाटनाचे फोटो देखील तिने शेअर केले होते.या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर नारळ फोडून या स्टुडीओचं उद्धाटन करताना दिसला होता. तसेच याच फोटोमध्ये सारा तेंडुलकर त्या अकॅडमीची कागदपत्रे आणि चावी घेताना दिसली होती. या उद्घाटन सोहळ्याला विशेष म्हणजे अर्जून तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक देखील उपस्थित होती.
या पिलेटस अकॅडमीला ओपन होऊन आता चार महिने पार पडले आहेत.या दरम्यान अनेकांनी या अकॅडमीला भेट दिली आहे.
