TRENDING:

PBKS vs DC : दिल्लीने जाता जाता पंजाबचा करेंक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या स्वप्नांचा चुराडा, टॉप 2 मधून बाहेर?

Last Updated:

शनिवारी रंगलेल्या आयपीएलच्या सामन्यात प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या दिल्ली कॅपिटल्सने पंजाबचा 6 विकेट्स राखून पराभव केला आहे. दिल्लीने हा विजय मिळवून जाता जाता पंजाबचा करेंक्ट कार्यक्रम केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
PBKS vs DC : शनिवारी रंगलेल्या आयपीएलच्या सामन्यात प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या दिल्ली कॅपिटल्सने पंजाबचा 6 विकेट्स राखून पराभव केला आहे. दिल्लीने हा विजय मिळवून जाता जाता पंजाबचा करेंक्ट कार्यक्रम केला. कारण या पराभवामूळे आता पंजाब आता टॉप 2 मधून बाहेर होण्याची शक्यता आहे.
shreyas iyer ipl 2025
shreyas iyer ipl 2025
advertisement

खरं तर दिल्लीविरूद्ध जर पंजाबने सामना जिंकला असता तर श्रेयसचा संघ 13 सामन्यात 19 गुणांसह टेबल टॉपला गेला असता.मात्र पराभवामुळे पंजाब किंग्ज 13 सामन्यात 17 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आता पंजाबचा शेवटचा सामना हा मुंबई विरूद्ध असणार आहे. या सामन्यात देखील जर पंजाबचा पराभव झाला तर ते टॉप 2 मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामु्ळेच दिल्लीविरूद्धच्या पराभवाने पंजाबचा मोठा गेम झाला आहे.

advertisement

आता जर पंजाब मुंबई विरूद्ध जिंकली तर त्यांचे गुण 19 गुण होणार आहेत. या द्वारे पंजाब टॉप 2 मध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. पण मुंबई सारख्या बलाढ्य संघाविरूद्ध जिंकणे श्रेयस अय्यरच्या टीमला खूपच कठीण जाणार आहे.त्यामुळे पंजाबचा काही खरं नाही आहे.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (डब्ल्यू), श्रेयस अय्यर (क), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, अजमातुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग

advertisement

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (क), सेदिकुल्ला अटल, करुण नायर, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स (डब्ल्यू), आशुतोष शर्मा, विपराज निगम, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PBKS vs DC : दिल्लीने जाता जाता पंजाबचा करेंक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या स्वप्नांचा चुराडा, टॉप 2 मधून बाहेर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल