मॅथ्यू ब्रीट्जकेने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेमधून पदार्पण केलं, यानंतर आता ब्रीट्जके त्याची पाचवी वनडे खेळत आहे. मॅथ्यू ब्रीट्जकेने त्याच्या वनडे पदार्पणाच्या सामन्यातही मोठं रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं होतं. करिअरच्या पहिल्याच वनडेमध्ये ब्रीट्जकेने 150 रनची दमदार खेळी केली होती. यानंतर तो दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगमध्ये धमाका करत आहे.
85 रन करून आऊट झाला ब्रीट्जके
advertisement
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये ब्रीट्जके 85 रनची खेळी करून आऊट झाला आहे. 77 बॉलच्या या खेळीमध्ये त्याने 7 फोर आणि 3 सिक्स लगावले. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 330 रन केले. ब्रीट्जकेशिवाय ट्रिस्टन स्टब्सनेही अर्धशतक केलं. स्टब्सने 62 बॉलमध्ये 58 रन केले. याशिवाय मार्करमने 49, रियान रिकलटनने 35 रनची खेळी केली. डेवाल्ड ब्रेविसने 20 बॉलमध्ये 42 आणि कॉर्बिन बॉशने 29 बॉलमध्ये नाबाद 32 रन करून दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 330 रनपर्यंत पोहोचवला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर आदिल रशीदला 2 आणि जेकब बेथलला एक विकेट मिळाली. 3 वनडे मॅचच्या या सीरिजमधील पहिली मॅच इंग्लंडने गमावली आहे, त्यामुळे सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकावा लागणार आहे.