प्रकरणात चौकशीचे आदेश दिले
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने गमावल्यानंतर त्यांनी ट्रॉफी गमावली. आता, इंग्लिश खेळाडूंवर मद्यपानाचे आरोप होत आहेत. मीडिया रिपोर्ट्स समोर आल्यानंतर इंग्लंड बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लिश संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. ब्रिस्बेन कसोटी गमावल्यानंतर इंग्लिश खेळाडूंनी सलग सहा दिवस मद्यपान केले. यामध्ये नूसा शहरात सहा दिवसांच्या सुट्टी मागून पार्टी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय.
advertisement
इंग्लिश खेळाडू दारू पितानाचे फोटो लीक
दुसरी कसोटी गमावल्यानंतर, इंग्लंड क्रिकेट संघ क्वीन्सलँडमधील समुद्रकिनाऱ्यावरील शहरात विश्रांतीसाठी गेला. तेथे इंग्लिश खेळाडू दारू पितानाचे अनेक फोटो समोर आले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं. जर लोक म्हणत असतील की आमचे खेळाडू बाहेर गेले आणि खूप मद्यपान केले, तर निश्चितच चौकशी होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी जास्त मद्यपान करणं योग्य नाही. जर त्याची चौकशी झाली नाही तर ते चुकीचं ठरेल, असं इंग्लिश संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी म्हटलंय.
एक ग्लास वाइन घेतली तर ते ठीक
मी जे ऐकलं आहे त्यावरून असे दिसते की इंग्लंडचे खेळाडू मर्यादेत होते. गेल्या एक-दोन दिवसांत जे लिहिले आहे ते मी वाचले आहे. जर असे काही घडले असेल तर ते सहन केले जाणार नाही. मी मद्यपान करत नाही. मला वाटते की मद्यपान संस्कृती कोणालाही मदत करत नाही. जर खेळाडूंनी रात्रीच्या जेवणासोबत एक ग्लास वाइन घेतली तर ते ठीक आहे. त्यापेक्षा जास्त मद्यपान करणं निरुपयोगी असल्याचं रॉब यांनी म्हटलं आहे.
इंग्लंडची निराशाजनक कामगिरी
दरम्यान, सध्याच्या मालिकेत इंग्लंडची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे, त्यांनी तिन्ही कसोटी सामने गमावले आहेत, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला अॅशेस राखता आली आहे. गेल्या 18 सामन्यांमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
