दुसऱ्या डावात टीम इंडिया फिल्डिंग करत असताना हे घडले. डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स क्रीजवर असताना एक चाहता मैदानात घुसला. चाहत्याने विराट कोहलीकडे धाव घेतली आणि त्याला मिठी मारली. पण, विराट कोहली त्या माणसाशी सभ्यतेने वागला आणि त्याला मैदान सोडण्यास सांगितले. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी आले, त्यांनी त्याला पकडले आणि मैदानाबाहेर नेले. कोहलीने सुरक्षा कर्मचाऱ्यांना चाहत्याशी सौम्यतेने वागण्यास सांगण्यात आले.
advertisement
मोठा स्कोअर करण्यात कोहली अपयशी
या सामन्यातील विराट कोहली मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. मागच्या वनडे सामन्यात 93 रनची खेळी करून भारताला विजय मिळवून देणाऱ्या कोहलीला या सामन्यात फक्त 23 रन करता आल्या. न्यूझीलंडचा युवा क्रिकेटपटू क्रिस्टियन क्लार्कने त्याला आऊट केले. बॉल कोहलीच्या बॅटच्या आतील बाजूला लागला आणि स्टम्पवर लागला. या सामन्यात कोहलीशिवाय रोहित शर्माचे चाहतेही दुःखी झाले कारण तो फक्त 24 रनवर बाद झाला. रोहितलाही क्लार्कने बाद केले.
भारताचा पराभव
केएल राहुलच्या नाबाद 112 रनच्या खेळीमुळे भारताने 284 रनचा टप्पा गाठला, पण खराब बॉलिंगमुळे भारतीय टीमला सामना गमवावा लागला. डॅरिल मिचेल आणि विल यंग यांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने सामना जिंकला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. मिचेलने नाबाद 133 रन केल्या, तर यंगने 87 रनची खेळी केली. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांमध्ये 163 रनची भागीदारी झाली, ज्यामुळे सामन्याचा मार्ग बदलला.
