बिहारने एक नवा विक्रम रचला
विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारने एक नवा विक्रम रचला आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्ध प्लेट लेव्हल सामन्यात संघाने लिस्ट-ए इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, बिहारने 50 ओव्हरमध्ये सहा गडी गमावून 574 धावा केल्या, जो लिस्ट-ए क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वोच्च संघ धावसंख्या ठरला. याआधी लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या तमिळनाडूच्या नावावर होती. 2022 मध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्यांनी दोन गडी गमावून 506 धावा केल्या होत्या.
advertisement
1963 नंतर असं पहिल्यांदाच घडलं!
लिस्ट ए क्रिकेटची सुरुवात 1963 मध्ये झाली. 72 वर्षांत, कोणत्याही डावात 550 किंवा त्याहून अधिक धावा झाल्या नव्हत्या. तमिळनाडूने यापूर्वी फक्त एकदाच लिस्ट ए मध्ये 500 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. हाच स्कोअर 2022 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही झाला होता. आता, तीन वर्षांनंतर, बिहारने अरुणाचल प्रदेशविरुद्ध प्लेट ग्रुप सामन्यात हा विक्रम मोडला आहे.
सूर्यवंशीच्या खेळीने इतिहास बदलला
बिहारच्या या ऐतिहासिक खेळीतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कर्णधार साकिबुल गनी आणि वैभव सूर्यवंशी यांची फलंदाजी. वैभवने 16 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 226 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या. सूर्यवंशीने भारतीयांमध्ये दुसरे सर्वात जलद लिस्ट-ए शतक तर केलेच पण डिव्हिलियर्सचा सर्वात जलद 150 धावांचा विश्वविक्रमही मोडला. खालच्या क्रमवारीत कर्णधार साकिबुल गनीने 40 चेंडूत 128 धावा केल्या आणि धावसंख्या 570 च्या पुढे नेली. ही धावसंख्या आता विजय हजारे ट्रॉफी आणि लिस्ट-ए दोन्हीमध्ये एक नवीन बेंचमार्क बनली आहे.
