मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न अन्...
ही घटना पाकिस्तानच्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये घडली, जेव्हा हार्दिकने टीम इंडियासाठी बॉलिंगची सुरुवात केली. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर पाकिस्तानचा ओपनर साहिबजादा फरहानने एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटचा संपर्क नीट न झाल्याने बॉल मिड-ऑनच्या दिशेने हवेत गेला, जिथे रिंकू सिंगने एक सोपा कॅच पकडला. यामुळे पाकिस्तानला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आणि त्यांची लय बिघडली.
advertisement
विशेष म्हणजे, हार्दिक पंड्याला फरहानचा शॉट पाहताच तो आऊट होणार याची खात्री पटली होती. त्याने बॉल फिल्डरच्या हातात जाण्याची वाटही पाहिली नाही, तर थेट बॅट्समनच्या डोळ्यात डोळे घालून त्याला खुन्नस दिली. त्याने शांतपणे चालत बॅट्समनकडे पाहत आपला आनंद साजरा केला, ज्याला नेटकरी 'नो लुक विकेट' असे म्हणत आहेत. हार्दिकचा हा बोल्ड अॅटिट्युड पाहून भारतीय चाहते खुश झाले आहेत.
दरम्यान, साहिबजादा फरहान हा तोच खेळाडू आहे ज्याच्यावर पाकिस्तानमध्ये 'Hero in The Making' नावाची डॉक्युमेंट्री बनवण्यात आली आहे. या फिल्ममध्ये त्याने 2025 च्या आशिया कपमध्ये जसप्रीत बुमराहला मारलेल्या दोन सिक्सरचे खूप कौतुक करण्यात आलं होतं. मात्र, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतासमोर तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. अवघ्या 4 बॉलवर 0 रन्स करून तो माघारी परतला. पाकिस्तान त्याच्यावर 32 तासांची फिल्म बनवणार होते. पण फरहान शुन्यावर गेल्याने फिल्मचा सेट अप गुंडाळण्यात आलाय.
