advertisement

Sahibzada Farhan : 32 तासांची फिल्म बनवणार होते, पांड्याने चार मिनिटात विषय संपवला! पाहा प्रेमदासा स्टेडियममधील Video

Last Updated:

Sahibzada Farhan Viral Video : पाकिस्तानचा स्टार खेळाडू साहिबजादा फरहान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्याचे फॅन्स 32 तासांची फिल्म बनवण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतायेत.

IND vs PAK Sahibzada Farhan going to make 32 hour film
IND vs PAK Sahibzada Farhan going to make 32 hour film
India vs Pakistan Viral Video : श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-ट्वेंटी सामना खेळला गेला. या मॅचमध्ये पाकिस्तानची बॅटिंग ऑर्डर टीम इंडियाच्या बॉलर्सने उद्धवस्त केली. पाकिस्तानची टीम फक्त 114 धावांवर ऑलआऊट झाली. पाकिस्तानी स्पिनर्सपेक्षा भारतीय स्पिनर्सचा दबदबा पहायला मिळाला होता. अशातच पाकिस्तानच्या एका क्रिकेटरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा खेळाडू म्हणजे बुमराहला सिक्स मारल्यावर डॉक्युमेंन्ट्री बनवणारा...

थेट डॉक्युमेंन्ट्री बनवली होती

एखाद्याची अपेक्षा किती बारक्या असतात, याची प्रचिती तुम्हाला पाकिस्तानकडे पाहिल्यावर समजेल. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहान याने मागील आशिया कपमध्ये बुमराहला दोन सिक्स काय मारले, त्याने थेट डॉक्युमेंन्ट्री बनवली होती. पाकिस्तानमध्येच नव्हे तर संपूर्ण जगात या डॉक्युमेंन्ट्रीचं हसू झालं. पण पाकिस्तानने ही डॉक्युमेंन्ट्री अभिमानाने मिरवली. अशातच कालच्या मॅचमध्ये बुमराहला मारून 32 तासांची फिल्म तयार करण्याची पाकिस्तानच्या इच्छेवर पांड्याने चार मिनिटात पाणी फिरवलं. साहिबजादा फरहानची विकेट पाकिस्तानला धक्का होता.
advertisement

32 तासांची फिल्म

पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान असताना पहिल्याच ओव्हरमध्ये पांड्याला बॉलिंग देण्यात आली. पांड्याने आपल्या लाईन आणि लेंथवर फोकस करत साहिबजादा फरहानची विकेट काढली. चौथ्याच बॉलवर साहिबजादा फरहानला माघारी फिरावं लागलं. त्यामुळे 32 तासांची फिल्म तयार करण्याची इच्छा बाळगणाऱ्या पाकिस्तानची मोठी फजिती झाल्याचं दिसून आलं.
advertisement
दरम्यान, टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याच्या निर्णयावरही सलमानने स्पष्टीकरण दिलं की, पहिल्या डावात पीच थोडी चिकट होती आणि बॉल पकड घेत होता. मात्र, भारताने त्या परिस्थितीतही चांगली धावसंख्या उभारली, असं म्हणत सलमानने भारतीय बॅटर्सला विजयाचं क्रेडिट दिलं. यावेळी सलमान साहिबजादा फरहानवर नाराज असल्याचं दिसून आलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sahibzada Farhan : 32 तासांची फिल्म बनवणार होते, पांड्याने चार मिनिटात विषय संपवला! पाहा प्रेमदासा स्टेडियममधील Video
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement