जडेजा हिरो की विलेन?
अनिल कुंबळेने (Anil Kumable) यावेळी रविंद्र जडेजाच्या कामगिरीचं कौतुक केलं पण थोडी नाराजी देखील व्यक्त केली. जडेजाने थोडी अधिक जोखीम पत्कारायला हवी होती, असं मत अनिल कुंबळे यांनी व्यक्त केलं आहे. तर जडेजाची रणनिती योग्य होती, असं म्हणत गावस्करांनी जड्डूच्या भूमिकेचं समर्थन केलं. दोन्ही दिग्गज नेमकं काय म्हणालेत?
advertisement
जड्डू रिस्क घ्यायला हवी होती - कुंबळे
जडेजाला रूट, बशीर आणि वोक्सविरुद्ध धोका पत्करावा लागला. पण तुम्हाला माहिती आहे की रूट आणि बशीर हे ऑफस्पिनर आहेत जे बॉल बाहेर टाकत होते, परंतु बॉल जास्त वळत नव्हता. त्यामुळे स्पिन होईल किंवा बॅटला कट लागेल याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नव्हती. मला वाटले की त्याने एक किंवा दोन संधी घ्यायला हव्या होत्या, असं मत अनिल कुंबळेने व्यक्त केलंय. त्याविरुद्ध सुनील गावस्कर यांनी जड्डूच्या रणनीतीचं समर्थन केलं.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी रविंद्र जडेजाच्या रणनीतीचे समर्थन केलं आणि म्हटलं की, त्या परिस्थितीत जडेजा फार काही करू शकला नसता. गावस्कर म्हणाले, 'मला वाटतं की परिस्थितीनुसार तो खालच्या फळीतील फलंदाजांसह खेळत होता. तो शक्य तितका स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी अशा खेळपट्टीवर हवेत शॉट्स खेळण्यास तुम्ही कचरता. भारतीय संघ सहसा खेळ खोलवर नेणं पसंत करतो. तेच त्यांचं ध्येय होतं.', असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.