बॅडमिंटन खेळताना अचानक कोसळला
मिळालेल्या माहितीनुसार, उप्पल स्टेडियमवरील इनडोअर कोर्टमध्ये (Indoor Court) राकेश बॅडमिंटन खेळत असताना अचानक कोसळला. त्याच्यासोबत खेळणारे मित्र आणि इतर खेळाडूंनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी (Doctors) राकेशला मृत घोषित केलं. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
पाहा Video
advertisement
खासगी कंपनीत नोकरीला
राकेश हा खांबम (Khammam) जिल्ह्यातील तल्लाडा (Tallada) येथील माजी उपसरपंच (Deputy Sarpanch) गुंडला व्यंकटेश्वरलू (Gundla Venkateswarlu) यांचा मुलगा होता, अशी माहिती समोर आली आहे. राकेश हैदराबादमधील एका खासगी कंपनीत (Private Company) नोकरी करत होता. मात्र, बॅडमिंटनची आवड असल्याने तो नेहमी मैदानात कठीण परिश्रम करत होता.
नियमित आरोग्य तपासणी गरजेची
गेल्या काही काळापासून तरुण आणि निरोगी व्यक्तींनाही शारीरिक कसरत करताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा तरुणांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे. हृदयविकाराच्या वाढत्या धोक्यावर आणि नियमित आरोग्य तपासणीच्या गरजेवर यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.