30 सप्टेंबरपासून भारतात महिलांच्या वनडे वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतात खेळायला नकार दिल्यामुळे वर्ल्ड कप हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना 5 ऑक्टोबरला कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
advertisement
या वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला, त्यानंतर टीम इंडियाने त्यांचे सगळे सामने दुबईमध्ये खेळले. त्यामुळे आता पाकिस्ताननेही भारतात खेळणार नसल्याचं सांगितलं, या कारणामुळे पाकिस्तान त्यांचे सगळे सामने कोलंबोमध्ये खेळणार आहे.
2 नोव्हेंबरला होणार फायनल
महिला वनडे वर्ल्ड कपच्या लीग स्टेजमध्ये एकूण 28 लीग मॅच होणार आहेत, यानंतर सेमी फायनल आणि फायनलचे 3 नॉक आऊट सामने होतील, जे बंगळुरू, इंदूर, गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि कोलंबोमध्ये खेळवले जातील. पहिली सेमी फायनल 29 ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये होईल, पण पाकिस्तान सेमी फायनलला पोहोचली तर हा सामना कोलंबोमध्ये खेळवला जाईल. दुसरी सेमी फायनल 30 ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये होईल. 2 नोव्हेंबरला होणारी फायनलही बंगळुरू किंवा कोलंबोमध्ये होणार आहे.
वेस्ट इंडिज खेळणार नाही
वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या टीमनी थेट क्वालिफाय केलं आहे. तर यावर्षीच्या सुरूवातीला लाहोरमध्ये झालेल्या क्वालिफायरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश क्वालिफाय होणाऱ्या शेवटच्या 2 टीम ठरल्या होत्या. वेस्ट इंडिज या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय न झाल्यामुळे खेळणार नाही.