आयसीसीने नुकतीच क्रमवारी जारी केली आहे. या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. झिम्बाब्वेच्या सिंकदर रझाने अफगाणिस्तानच्या अजमतुल्लाह उमरजाईला मागे टाकले आहे. आणि सिंकदर रझा 302 रेटींग पॉईंटसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. ऑलराऊंडर खेळाडूंच्या क्रमवारील सिकंदर रझाने पहिलं स्थान पटकावलं आहे.
39 वर्षांच्या सिकंदर रझाने गेल्याच आठवड्यात श्रीलंकेविरूद्ध 2 वनडे सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. सिकंदरने 29 ऑगस्ट रोजी खेळलेल्या सामन्यात 92 धावांची शानदार खेळी केली होती. या खेळीनंतर झिम्बाब्वे सामना जिंकू शकली नव्हती. पण संघ विजयानजीक नक्कीच पोहोचली होती.299 आव्हानांचा पाठलाग करताना झिम्बाब्वे लक्ष्यापासून अवघ्या 8 धावा दूर राहिला होता.त्यामुळे झिम्बाब्वेला निसटता पराभव स्विकारावा लागला होता.त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी रजाने 59 धावांची खेळी केली होती.या सामन्यात देखील श्रीलंकेला सहज विजय मिळवता आला नव्हता.
advertisement
अजमतुल्लाची बादशाहत संपवली
सिंकदर रजा वनडेतील ऑलराऊंडर खेळाडूंच्या क्रमवारीत याआधी तिसऱ्या क्रमांकावर होता.पण श्रीलंकेविरूद्धच्या दोन सामन्यातील खेळीमुळे तो पहिल्या स्थानी पोहोचला होता. यावेळी त्याने अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर अजमतुल्लाह उमरजाई मागे टाकले आहे. त्यामुळे उमरजाई दुसऱ्या स्थानी फेकला आहे.
टीम इंडिया टॉप 5 मध्येही नाही
वनडे फॉरमॅटमधील ऑलराऊडर खेळाडूंच्या क्रमवारीत टीम इंडिया टॉप 5 मध्येही नाही.टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजा या क्रमवारीत नवव्या स्थानी आहे. त्याच्या नावावर 220 रेटींग पॉईंटस आहे. तर अक्षर पटेल 200 गुणांसह 15व्या स्थानी आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही सामना खेळला नसल्याने हा परिणाम दिसतोय.
टी20 मध्ये हार्दिक पंड्या आयसीसीच्या रॅकींगमध्ये 252 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर टेस्ट रॅकींगमध्ये रविंद्र जडेजा अव्वल स्थानी आहे. जडेजाच्या नावावर 405 रेटींग पॉईंट आहे.त्यामुळे जडेजाच्या आसपासही कुणी नाही. त्यामुळे वनडे फॉरमॅटमधील ऑलराऊडर खेळाडूंच्या क्रमवारी वगळता बाकी फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला आहे.