TRENDING:

T20 World Cup च्या तारखा समोर, भारतामध्ये फटाके फुटणार, 5 शहरांमध्ये सामन्यांचा थरार रंगणार!

Last Updated:

2026 मध्ये भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तारखा समोर आल्या आहेत. स्पर्धेमध्ये 20 टीम सहभागी होणार असून भारतातल्या 5 शहरांमध्ये सामन्यांचा थरार रंगणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 2026 मध्ये भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तारखा समोर आल्या आहेत. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाईल, असं वृत्त ईएसपीएन-क्रिकइन्फोने दिलं आहे. स्पर्धेमध्ये एकूण 20 टीम सहभागी होणार आहेत. भारतामधल्या 5 तर श्रीलंकेमधल्या 2 स्टेडियममध्ये वर्ल्ड कपच्या सामन्यांचं आयोजन केलं जाणार आहे. स्पर्धेची फायनल अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये खेळवली जाईल. पाकिस्तानची टीम फायनलला क्वालिफाय झाली तर फायनल कोलंबोला होईल, अन्यथा अहमदाबादमध्ये महामुकाबला रंगेल. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या बिघडलेल्या संबंधांमुळे दोन्ही टीमनी एकमेकांच्या देशात खेळायला नकार दिला आहे.
T20 World Cup च्या तारखा समोर, भारतामध्ये फटाके फुटणार, 5 शहरांमध्ये सामन्यांचा थरार रंगणार!
T20 World Cup च्या तारखा समोर, भारतामध्ये फटाके फुटणार, 5 शहरांमध्ये सामन्यांचा थरार रंगणार!
advertisement

टी-20 वर्ल्ड कपच्या तारखांची आयसीसीने घोषणा केली नसली, तरी 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या तारखा आयसीसीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या टीमना कळवल्या आहेत, असंही या वृत्तात सांगण्यात आलं आहे.

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी आतापर्यंत 15 टीम क्वालिफाय झाल्या आहेत, ज्यात भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, नेदरलँड्स आणि इटली यांचा समावेश आहे. तर उरलेल्या 5 टीमपैकी 2 टीम आफ्रिका भागातून क्वालिफाय होऊन येणार आहेत. तर उरलेल्या 3 टीम आशिया तसंच पूर्व आशिया पॅसिफिक भागातून क्वालिफाय होतील.

advertisement

2026 टी-20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट 2024 च्या वर्ल्ड कपसारखाच असणार आहे. सहभागी होणाऱ्या 20 टीमना 4 ग्रुपमध्ये विभागण्यात येणार आहे, म्हणजेच प्रत्येक ग्रुपमध्ये 5 टीम असणार आहेत. या 4 ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सुपर-8 साठी क्वालिफाय होतील. सुपर-8 मधल्या टॉप-4 टीममध्ये सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 55 मॅच खेळवल्या जातील.

advertisement

भारतात टी-20 क्रिकेटचा धमाका

2026 च्या सुरूवातीपासूनच भारतात टी-20 क्रिकेटचा धमाका पाहायला मिळणार आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात महिला प्रीमियर लीग (WPL) खेळवली जाईल, यानंतर टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आयपीएल 2026 ला सुरूवात होईल. आयपीएलचा मोसम 15 मार्च ते 31 मे पर्यंत खेळवला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय 11 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे तसंच टी-20 मॅचची सीरिजही खेळवली जाणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup च्या तारखा समोर, भारतामध्ये फटाके फुटणार, 5 शहरांमध्ये सामन्यांचा थरार रंगणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल