जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनीही 14 ओव्हर खेळून काढल्या, पण बुमराह आणि जडेजाने केलेली एक चूक टीम इंडियाला चांगलीच महागात पडली. बुमराह बॅटिंगला आल्यानंतर रवींद्र जडेजा ओव्हरच्या चौथ्या बॉलला रन काढत होता, त्यामुळे बुमराहला ओव्हरमध्ये उरलेले 2 बॉलच खेळावे लागत होते. पण ब्रायडन कार्सने टाकलेल्या 61 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला बुमराहने 1 रन काढली.
advertisement
ब्रायडन कार्सच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बुमराहने रन काढल्यामुळे 62व्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा बुमराह स्ट्राईकवर आला. बेन स्टोक्सच्या या ओव्हरचे दोन बॉल बुमराहने खेळून काढले, पण तिसऱ्या बॉलला बुमराह मोठा शॉट खेळायला गेला आणि कॅच आऊट झाला. कार्सच्या ओव्हरमध्ये बुमराहने एक रन काढली नसती, तर कदाचित स्टोक्सची पूर्ण ओव्हर बुमराहला खेळावी लागली नसती, ज्यामुळे बुमराहने विकेटही गमावली नसती.
भारताची बॅटिंग गडगडली
इंग्लंडने दिलेल्या 193 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची बॅटिंग गडगडली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हाच भारताने 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर पाचव्या दिवसाच्या पहिल्या तासाभरामध्येच पुन्हा एकदा टीम इंडियाची बॅटिंग कोसळली. ऋषभ पंत 9 रनवर, केएल राहुल 39 रनवर माघारी परतले. यानंतर वॉशिंग्टन सुंदर शून्य रनवर आणि नितीश कुमार रेड्डी 13 रनवर आऊट झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सला 3-3 विकेट मिळाल्या, तर ब्रायडन कार्सला 2, क्रीस वोक्सला 1 आणि शोएब बशीरला 1 विकेट घेण्यात यश आलं.