इनिंगच्या सुरूवातीच्या 2 ओव्हर अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने टाकल्या. या दोन्ही ओव्हरमध्ये न्यूझीलंडचे दोन्ही ओपनर डेवॉन कॉनवे आणि टीम सायफर्ट यांनी आक्रमक बॅटिंग केली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा स्कोअर 40 रन पार गेला होता, त्यामुळे सूर्यकुमार यादवने हर्षित राणाच्या हातात बॉल दिला.
हर्षित राणाने कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला आणि आपल्या पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला डेवॉन कॉनवेची विकेट घेतली. हर्षितने टाकलेल्या बॉलवर कॉनवेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल हवेत गेला आणि हार्दिक पांड्याने कॅच पकडला. कॉनवेची विकेट घेतल्यानंतर हर्षित राणाने ड्रेसिंग रूमच्या दिशेने बोटांनी 4 आकडा दाखवून सेलिब्रेशन केलं.
advertisement
हर्षित राणाने 4 आकडा नेमका का दाखवला? असा प्रश्न चाहत्यांना पडला. याआधी वनडे सीरिजमध्ये तीनही सामन्यांमध्ये हर्षित राणानेच कॉनवेची विकेट घेतली होती. आता टी-20 सीरिजमध्येही कॉनवेला पुन्हा एकदा हर्षितनेच पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. संपूर्ण दौऱ्यात 4 वेळा कॉनवेची विकेट घेतल्यामुळे हर्षितने 4 आकडा दाखवून सेलिब्रेशन केलं.
9 बॉलमध्ये 19 रन करून डेवॉन कॉनवे आऊट झाला, तर सायफर्टने 13 बॉलमध्ये 24 रन केले. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनरने 27 बॉलमध्ये नाबाद 47 रनची खेळी केली. याशिवाय रचिन रवींद्रने 26 बॉलमध्ये 46 रन केले. भारताकडून कुलदीप यादवला 2 विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
