टीमची लय बिघडवून टाकली
ईशान किशनने पावरप्लेचा पुरेपूर वापर करत टीमची धावसंख्या वेगाने पुढे नेली. त्याच्या या फटकेबाजीमुळे दबावाखाली असलेल्या भारतीय टीमला मोकळा श्वास घेता आला. मॅच संपल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने ईशानच्या या खेळीबद्दल मजेशीर विधान केले. सूर्याने सांगितले की, ईशान इतक्या जबरदस्त फॉर्ममध्ये होता की त्याने पावरप्लेमध्ये विरोधी टीमची पूर्णपणे लय बिघडवून टाकली होती.
advertisement
मला फक्त एकाच गोष्टीचा राग येत होता...
सूर्या म्हणाला की, "मला माहित नाही ईशान किशनने लंचमध्ये काय खाल्ले होते, पण 6 रन्सवर 2 विकेट्स गेलेल्या असताना पावरप्लेमध्ये 60 पेक्षा जास्त रन्स बनवताना मी कोणालाही पाहिले नाही. आम्हाला आमच्या फलंदाजांकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी निडरपणे खेळावे. मला फक्त एकाच गोष्टीचा राग येत होता की, तो पावरप्लेमध्ये मला स्ट्राईक देत नव्हता, मात्र नंतर मला परिस्थिती समजली."
नेटमध्ये भरपूर सराव केला
स्वतःच्या फॉर्मबद्दल बोलताना सूर्यकुमारने सांगितले की, त्याने नेटमध्ये भरपूर सराव केला होता आणि विश्रांतीनंतर तो पूर्णपणे ताजेतवाना होऊन मैदानात उतरला आहे. न्यूझीलंडची स्थिती एका वेळी 110 रन्सवर 2 विकेट्स अशी असताना त्यांना 230 पर्यंत मजल मारता येईल असे वाटले होते. मात्र, भारतीय बॉलर्सनी अचूक टप्प्यावर बॉलिंग करत न्यूझीलंडला रोखले आणि आपली जबाबदारी चोख पार पाडली.ॉ
आत्मविश्वास प्रचंड वाढला
सध्या टीममधील वातावरण अत्यंत उत्साही आणि आनंदी असल्याचे सूर्याने नमूद केले. खेळाडू एकमेकांच्या यशाचा आनंद घेत आहेत आणि हीच सकारात्मकता पुढे नेण्याचा कॅप्टनचा मानस आहे. ईशान किशनच्या या धडाकेबाज खेळीने भारतीय फॅन्सना पुन्हा एकदा हाय व्होल्टेज क्रिकेटचा अनुभव दिला असून, आगामी मॅचसाठी टीमचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे.
