न्यूझीलंडने वनडे आणि टी-20 टीमची घोषणा केली असली तरी भारताने मात्र अजूनपर्यंत फक्त टी-20 टीमच जाहीर केली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये जे खेळाडू खेळणार आहेत, त्यांचीच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी निवड झाली आहे. तर वनडे सीरिजसाठी अजून भारतीय टीम जाहीर झालेली नाही.
स्टार खेळाडूला पहिल्यांदाच संधी
जेडेन लेनोक्सला पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय टीममध्ये संधी देण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर त्याला ही संधी मिळाली. जेडेन काही काळापासून आमच्या रडारवर आहे. त्याला न्यूझीलंड ए कडून खेळण्याचा बराच अनुभव आहे, असं मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर म्हणाले आहेत.
advertisement
केन विलियमसनला का वगळलं?
न्यूझीलंडच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या केन विलियमसनला भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजमधून वगळण्यात आलं आहे. केन विलियमसनला SA20 खेळणार असल्यामुळे त्याची न्यूझीलंडच्या टीममध्ये निवड झाली नाही.
न्यूझीलंडची वनडे टीम
मायकल ब्रेसवेल (कर्णधार), आदि अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जॉश क्लार्कसन, डेवॉन कॉनवे, जॅक फाऊल्क्स, मिच हे (विकेट कीपर), काइल जेमिसन, निक केली, जेडेन लेनोक्स, डॅरेल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मायकल रे, विल यंग
न्यूझीलंडची टी-20 टीम
मिचेल सॅन्टनर (कर्णधार), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, काइल जेमिसन, बेवन जेकब्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टीम रॉबिन्सन, इश सोढी
