TRENDING:

T20 WC Final : अहमदाबादमध्ये क्रिकेट 'खेळ नाही बिझनेस', हॉटेलच्या किमतीत 400 टक्क्यांची वाढ, फ्लाईटचं तिकीट 14 हजारावर!

Last Updated:

IND vs NZ Ahmadabad Hotel Rate : हॉटेलचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी राहण्यासाठी गांधीनगरला पसंती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND vs NZ T20 World Cup Final Ticket : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल मॅचमुळे अहमदाबादमध्ये सध्या उत्सवाचे वातावरण आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी जगभरातून क्रिकेट फॅन्स गुजरातमध्ये दाखल होत आहेत. या प्रचंड गर्दीमुळे अहमदाबादमधील हॉटेलची मागणी अचानक वाढली असून रूम्सचे दर गगनाला भिडले आहेत. जे रूम्स आधी 5 ते 20 हजार रुपयांना मिळत होते, त्यांची किंमत आता 15 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
IND vs NZ T20 World Cup Final Ticket
IND vs NZ T20 World Cup Final Ticket
advertisement

10 हजार हॉटेल रूम्स उपलब्ध

अहमदाबाद शहरात सुमारे 10 हजार हॉटेल रूम्स उपलब्ध आहेत. फायनलच्या दिवशी शहरातील बहुतांश हॉटेल्स 80 टक्क्यांहून अधिक भरलेली असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हॉटेलचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी राहण्यासाठी गांधीनगरला पसंती दिली आहे. फॅन्स तिथं राहून मॅचच्या दिवशी थेट अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचण्याचे नियोजन करत आहेत.

advertisement

विमान तिकीट कित्येक पटीने वाढलं

केवळ हॉटेलच नाही, तर विमान प्रवासाचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. मुंबई ते अहमदाबाद विमान तिकीट, जे सामान्यतः 3 ते 4 हजार रुपयांना मिळते, ते आता 15 ते 17 हजार रुपयांच्या घरात गेले आहे. दिल्ली आणि बंगळुरूहून अहमदाबादला येणाऱ्या विमानांचे भाडेही अनुक्रमे 14 हजार आणि 13 हजार रुपयांवर पोहोचले आहे. ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रासाठी ही वर्ल्ड कप फायनल मोठी पर्वणी ठरली आहे.

advertisement

अहमदाबादसाठी विशेष ट्रेन

वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देखील खबरदारी घेतली आहे. क्रिकेट प्रेमींच्या सोयीसाठी दिल्ली ते अहमदाबाद अशी विशेष ट्रेन चालवण्यात आली आहे. प्रवासाच्या आणि राहण्याच्या महागड्या दरांचा विचार न करता, केवळ टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी हजारो फॅन्स अहमदाबादच्या दिशेने कूच करत आहेत. तर दुसरीकडे ज्यांना मॅचचं तिकीट मिळालं नाही. त्यांना ब्लॅकने तिकीट घेण्याची स्पर्धा सुरू झालीये.

advertisement

स्टेडियमचं 75,000 तिकीट दर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशक्य काहीच नाही! लहानपणी क्रिकेटची आवड, तिनं लग्नानंतर केलं असं, घरात 100 ट्रॉफ
सर्व पहा

दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमचं 3,000 ते 75,000 तिकीट दर अधिकृत साईटवर आहे. तर प्रीमियम हॉस्पिटॅलिटी आणि क्लब लाउंज सीट्ससाठी सुमारे 50 हजार ते 75 हजार रुपयांपर्यंत किंमत आहे. अहमदाबादमध्ये सुमारे 1.3 लाख प्रेक्षक बसू शकतात. तर काळ्या बाजारात किंमती थेट पाच लाखाच्या वर गेल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मॅचच वातावरण देखील तापलंय.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 WC Final : अहमदाबादमध्ये क्रिकेट 'खेळ नाही बिझनेस', हॉटेलच्या किमतीत 400 टक्क्यांची वाढ, फ्लाईटचं तिकीट 14 हजारावर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल