पाकिस्तानचा बॅटर साहिबजादा फरहान याने अर्धशतक केल्यानंतर एके-47 चालवल्यासारखं सेलिब्रेशन केलं. तर पाकिस्तानचे बॉलर शाहिन आफ्रिदी आणि हारिस राऊफ टीम इंडियाचे ओपनर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलला डिवचत होते. यानंतर अभिषेक आणि गिलने दोघांनाही बॅटने तर प्रत्युत्तर दिलंच, पण हे दोघं हारिस राऊफच्या अंगावरही धावून गेले. अखेर अंपायरला या वादामध्ये मध्यस्थी करावी लागली.
advertisement
हा राडा झाल्यानंतर बाऊंड्री लाईनवर भारतीय चाहत्यांनी हारिस राऊफला डिवचायला सुरूवात केली. तेव्हा त्याने भारतीय प्रेक्षकांना पाहून विमान पाडल्याचे हातवारे केले. तसंच भारतीय चाहत्यांना पाहून त्याने 6-0 असे इशारे केले. हारिस राऊफचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर आता अर्शदीप सिंगने हारिस राऊफवर पलटवार केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
मॅचनंतरही अभिषेक-गिलने सुनावलं
दुसरीकडे सामना संपल्यानंतरही अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंना सुनावलं आहे. कारण नसताना पाकिस्तानचे खेळाडू आमच्या अंगावर येत होते, त्यामुळे आम्ही त्यांना बॅटने प्रत्युत्तर दिल्याचं अभिषेक शर्मा प्लेअर ऑफ द मॅच मिळाल्यानंतर म्हणाला. तर शुभमन गिलनेही पाकिस्तानवर पलटवार केला. खेळ बोलतो, शब्द नाही, अशी पोस्ट गिलने या सामन्यानंतर केली आहे.
टीम इंडिया फायनलजवळ
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम आशिया कपच्या फायनलजवळ पोहोचली आहे. बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळाला तरी भारतीय टीम फायनलमध्ये जाईल. तर पाकिस्तानला मात्र त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.