मूळचा धाराशिवचा असलेला आणि पुण्यात आपली स्वप्न उराशी घेऊन आलेला कुलदीप आंबेकर. पुण्यात येताच कुलदीपला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. पोटाची आग काय असते, हे त्याने स्वतः अनुभवलं. या कठीण अनुभवातून प्रेरणा घेऊन त्याने स्टुडंट हेल्पिंग हँड्स संस्था 2018 साली स्थापन केली. या संस्थेद्वारे आतापर्यंत 5000 हून अधिक विद्यार्थ्यांना दोन वेळचं जेवण पुरवलं गेलं आहे. सध्या ही संस्था दररोज 500 विद्यार्थ्यांना सकस जीवनाचा डबा विनामूल्य पुरवत आहे.
advertisement
Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीसाठी नवे नियम लागू, ती चूक महागात पडणार
अन्न शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कसा घ्यावा?
अन्न शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज करावा लागतो. या अर्जांची काटेकोर पडताळणी केली जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती, एकल पालकत्व अशा महत्त्वाच्या बाबींचा विचार केला जातो. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्या मुलाखतीत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड करून त्यांना अन्न शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. पुण्यातील गांजवे चौकात या संस्थेचे ऑफिस आहे.
स्टुडंट हेल्पिंग हँड्स संस्थेमार्फत पुण्यात विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली अन्न शिष्यवृत्ती योजना हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये, या उद्देशाने या योजनेतून अशा विद्यार्थ्यांना दररोज दोन वेळचे मोफत जेवण उपलब्ध करून दिले जाते. सीएसआर निधी आणि वैयक्तिक देणगीदारांच्या मदतीने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा आतापर्यंत जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही संस्थेकडून मार्गदर्शन केले जाते.