बारामती हादरलं! देवीच्या दारातच पाच जणांवर कोयत्याने वार, ज्योत आणली अन्...
- Published by:Prachi Amale
- Reported by:JITENDRA JADHAV
Last Updated:
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी रात्री साडेआठच्या सुमारास वंजारवाडी येथील दत्त मंदिर समोर ही घटना घडली आहे.
पुणे : बारामती तालुक्यातील वंजारवाडीमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांवर कोयत्याने वार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी रात्री साडेआठच्या सुमारास वंजारवाडी येथील दत्त मंदिर समोर ही घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अमोल अण्णा चौधरी याच्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर,अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने,शुभम वाघ आणि तेजस हजारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर शुभम वाघ,अली मुजावर आणि ओम अर्जुन कुचेकर या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या हल्ल्यामध्ये सुनिल गोरख चौधर,अमोल आण्णा चौधर, भारत गोकुळ चौधर, सागर चंद्रकांत चौधर आणि आदित्य सर्जेराव चौधर हे पाच जण जखमी झाले आहेत.
advertisement
मंदिरासमोर हल्ला
पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार,सोमवारी 22 सप्टेंबर रोजी फिर्यादी अमोल आण्णा चौधर, भारत गोकुळ चौधर, सागर चंद्रकांत चौधर, आदित्य सर्जेराव चौधर, सुनिल गोरख चौधर हे सर्व व इतर नवरात्र उत्सव सुरू असल्याने देवीची ज्योत राशीन येथून मौजे वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेऊन आले. मंदिरासमोर पुजा पाठ करून पारंपारिक वाद्यावर उत्सव साजरा करत होते. त्याचवेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी त्या ठिकाणी आली.
advertisement
बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
त्यातून मधुन ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर,अली मुजावर, दिपक भोलनकर, रवी माने,शुभम वाघ आणि तेजस हजारे होते. त्यांच्या हातात कोयता, चाकू अशी हत्यारे होती. त्यांनी दत्त मंदिरासमोर उभ्या असणाऱ्या फिर्यादी यासह त्यांच्या भावांवर हल्ला चढवला, यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे अधिकचा तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 23, 2025 2:55 PM IST