VVCMC Recruitment 2026: वसई-विरार महापालिकेत मोठी भरती! दरमहा 75 हजार पगार; ‘अशा प्रकारे’ करा अर्ज
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
वसई-विरार महापालिकेत NUHM अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे आरोग्य विभागांमध्ये तब्बल 145 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
वसई-विरार: वसई-विरार महापालिकेत NUHM अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे आरोग्य विभागांमध्ये तब्बल 145 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याबाबतचे अधिकृत पत्रक पालिकेने जाहीर केले आहे. भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांमध्ये बालरोग तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, महिला स्टाफ नर्स, औषध निर्मात्यासह अशा 11 वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना थेट मुलाखत असणार आहे. वसई- विरार महानगरपालिकेने जाहीर केलेल्या जाहीरातीमध्ये भरतीबद्दलची सर्व माहिती दिली आहे.
23 जानेवारी रोजी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया होणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच नोकरभरती होणार आहे. बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक आणि कार्यक्रम सहाय्यक पदांसाठी प्रत्येकी एक जागा, औषध निर्माता पदासाठी दोन जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी तीन जागा, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी 10 जागा, महिला स्टाफ नर्स पदासाठी 18 जागा, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी 19 जागा तर, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदासाठी 37 जागा आणि वैद्यकीय अधिकारी पदासाठी 52 जागा रिक्त आहेत. अशा एकूण 145 रिक्त जागा आहेत. नोकरभरतीची सविस्त माहिती वसई विरार महानगर पालिकेच्या वेबसाईटवरून माहिती दिली आहे.
advertisement
शैक्षणिक पात्रता:
- बालरोग तज्ञ पदासाठी MD Paed/DCH/DNB- पगार 75,000
- साथरोग तज्ञ पदासाठी (i) MBBS/BDS/AYUSH (ii) MPH/MHA/ MBA(Health)- पगार 35,000
- शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक पदासाठी (i) MBBS/BDS/AYUSH (ii) MPH/MHA/ MBA(Health)- पगार 35,000
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS- पगार 75,000
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS- पगार 30,000
- वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS- पगार 60,000
- महिला स्टाफ नर्स पदासाठी GNM/B.Sc (Nursing)- पगार 34,800
- औषध निर्माता पदासाठी D.Pharm/B.Pharm- पगार 20,800
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी (i) B.Sc (ii) DMLT- पगार 20,800
- कार्यक्रम सहाय्यक पदासाठी (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी आणि इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.- पगार 17,000
- बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदासाठी (i) 12 (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स- पगार 18,700
advertisement
दरम्यान, बालरोग तज्ञ पदासाठी, साथरोग तज्ञ पदासाठी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी, वैद्यकीय अधिकारी पदासाठी 18 ते 70 व्या वयापर्यंतची वयाची अट असणार आहे. इतरत्र कोणत्याही उमेदवाराला वयामध्ये सूट नाही. तर, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक पदासाठी, महिला स्टाफ नर्स पदासाठी, औषध निर्माता पदासाठी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी, कार्यक्रम सहाय्यक पदासाठी, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षांपर्यंत आहे. मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट आहे. वसई- विरार हे नोकरीचे ठिकाण असून अर्ज भरताना अर्जदारांना फी भरायची नाहीये. अर्जदारांना प्रत्यक्षात वसई- विरार महानगरपालिकेमध्ये मुलाखतीसाठी यावं लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने मुलाखत होणार नाही.
advertisement
बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदासाठी, वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.) हे मुलाखतीचे ठिकाण असणार आहे. 02 फेब्रुवारी ते 06 फेब्रुवारी 2026 दरम्यान थेट मुलाखत होणार आहे. महिला स्टाफ नर्स, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदासाठी, वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.) हे मुलाखतीचे ठिकाण असणार आहे. तर, या पदांना अर्ज सादर करण्याची तारीख 02 फेब्रुवारी ते 06 फेब्रुवारी 2026 दरम्यान असणार आहे. दरम्यान, ही भरती 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 4:17 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
VVCMC Recruitment 2026: वसई-विरार महापालिकेत मोठी भरती! दरमहा 75 हजार पगार; ‘अशा प्रकारे’ करा अर्ज










