advertisement

Vastu Tips: घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर फोटो असावे तर असेच; अशुभ गोष्टीही शुभ परिणाम देऊ लागतील

Last Updated:

South Wall Painting Vastu: वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही अनुशासन, स्थिरता आणि दृढ निर्णयांची दिशा मानली जाते. जर या भिंतीचा वापर योग्य फोटो, रंग किंवा वॉलपेपर लावण्यासाठी केला, तर ती तुमच्या जीवनात प्रचंड आत्मविश्वास आणि करिअरमधील प्रगतीची दारे उघडू शकते.

News18
News18
मुंबई : वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंती मानसिकतेवर आणि आपल्या नशिबावरही मोठा प्रभाव टाकत असतात. खासकरून दक्षिण दिशेच्या भिंतीबाबत अनेकांच्या मनात भीती किंवा साशंकता असते, परंतु ही दिशा नेहमीच अशुभ नसते. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही अनुशासन, स्थिरता आणि दृढ निर्णयांची दिशा मानली जाते. जर या भिंतीचा वापर योग्य फोटो, रंग किंवा वॉलपेपर लावण्यासाठी केला, तर ती तुमच्या जीवनात प्रचंड आत्मविश्वास आणि करिअरमधील प्रगतीची दारे उघडू शकते. फक्त दक्षिण दिशा अशुभ न मानता तिचे योग्य वास्तू नियोजन करणे सुख-शांतीसाठी आवश्यक ठरते.
दक्षिण भिंतीचे वास्तू महत्त्व - वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा व्यक्तीचे आत्मबळ आणि निर्णयक्षमता वाढवण्यास मदत करते. या दिशेच्या भिंतीवर चुकीचे रंग किंवा उदास फोटो असतील, तर घरातील वातावरण आळशी बनते, कामात अडचणी वाढू शकतात. याउलट, योग्य पेंटिंगमुळे घरात सकारात्मकता आणि शिस्त टिकून राहते.
कोणते फोटो लावावेत?
दक्षिण भिंतीवर ताकद आणि मजबुती दर्शवणारे फोटो लावणं शुभ मानलं जातं. धावणाऱ्या घोड्यांचे फोटो करिअरमध्ये वेग, प्रगती आणि यशाचं प्रतीक मानले जातात. उगवत्या सूर्याचा फोटो आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूपच प्रभावी ठरतो. डोंगर किंवा पर्वतांचे फोटो घरात स्थिरता आणि आधार देण्याचं काम करतात. त्याचबरोबर पराक्रमी योद्धे, राजा किंवा महाराजांचे फोटो लावल्याने नेतृत्वगुण वाढण्यास मदत होते.
advertisement
काय लावणं टाळावं?
दक्षिण भिंतीवर रडणारे, दुःख दर्शवणारे किंवा नकारात्मक भाव दाखवणारे फोटो कधीही लावू नयेत. हिंसक प्राणी, युद्ध, भांडण किंवा संघर्ष दाखवणारे फोटो टाळलेलेच बरे. विशेषतः पाण्याशी संबंधित फोटो जसे नदी, धबधबा किंवा समुद्र यांचे फोटो या दिशेला लावू नयेत. मावळत्या सूर्याचा फोटोही दक्षिण भिंतीसाठी अशुभ मानला जातो.
वॉलपेपर आणि रंगांची निवड
advertisement
दक्षिण भिंतीसाठी वॉलपेपर निवडताना रंगांकडे खास लक्ष देणं गरजेचं आहे. लाल, गडद नारंगी, तपकिरी आणि मरून रंगाचे वॉलपेपर या दिशेसाठी योग्य मानले जातात. निळे किंवा फारच फिकट रंगांचे वॉलपेपर वापरणं टाळावं. जास्त गोंगाट नसलेले, टेक्सचर असलेले किंवा साध्या डिझाइनचे वॉलपेपर या भिंतीवर अधिक शोभून दिसतात.
advertisement
कौटुंबिक फोटो आणि करिअर - दक्षिण भिंतीवर कुटुंबाचा फोटो लावायचा असेल, तर त्या फोटोमध्ये घरातील सगळे सदस्य आनंदी आणि हसताना दिसणं महत्त्वाचं आहे. फोटो स्वच्छ, स्पष्ट आणि नीट फ्रेममध्ये असावा. कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावणं टाळावं. घरातील ऑफिसच्या दक्षिण भिंतीवर प्रेरणादायी फोटो किंवा विचार लावल्यास कामात उत्साह आणि सकारात्मकता टिकून राहते.
advertisement
काही महत्त्वाच्या टिप्स - दक्षिण भिंत नेहमी स्वच्छ, नीटनेटकी आणि प्रकाशमान ठेवावी. तुटलेले, खराब झालेले किंवा जुने फोटो लगेच काढून टाकावेत. भिंतीवर खूप जास्त फोटो लावण्यापेक्षा एक-दोन दर्जेदार आणि अर्थपूर्ण फोटो लावणं जास्त चांगलं मानलं जातं. यामुळे घराचं वास्तू संतुलन बिघडत नाही आणि वातावरणही सकारात्मक राहतं.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर फोटो असावे तर असेच; अशुभ गोष्टीही शुभ परिणाम देऊ लागतील
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement