Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीसाठी नवे नियम लागू, ती चूक महागात पडणार
Last Updated:
Pune News : पुण्यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांसाठी पोलिसांनी निर्बंध अधिक कडक केले आहेत. आता फक्त दंड भरल्यावर काम संपणार नाही तर नियम मोडल्यास कठोर कायदेशीर कारवाईही केली जाईल.
पुणे : पुणे शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई कठोर स्वरूपात सुरु आहे. नुकत्याच शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयाने दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या दोन तरुणांना कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. जी बेशिस्त वाहनचालकांसाठी एक स्पष्ट संदेश ठरली आहे. या निर्णयातून असे दिसून येते की न्यायालय वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना माफ करणार नाही.
नेमके प्रकरण तरी काय?
पहिल्या प्रकरणात, पिंपळे गुरव येथील 29 वर्षीय रोहित वर्मा याला न्यायाधीश एस. बी. पाटील यांनी 15 दिवसांची साधी कैद आणि 12,000 रुपयांचा दंड ठोठावला. वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 185, आणि 3/181 अंतर्गत गुन्हा (4979/2024) नोंदवला होता. या प्रकरणात आरोपी दारू पिऊन वाहन चालवताना पकडला गेला होता आणि त्याच्या या क्रियेतून रस्त्यावर सुरक्षिततेस मोठा धोका निर्माण झाला होता.
advertisement
दुसऱ्या प्रकरणात, नांदेड सिटी, पुणे येथील 31 वर्षीय राजकुमार मांगीणी कुलाल यालाही न्यायालयाने 15 दिवसांची साधी कैद आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला. त्याच्यावरही वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 आणि 185 अंतर्गत गुन्हा (01/2025) नोंदवला होता. दोन्ही प्रकरणांमध्ये सरकारी वकील वर्षा राणी जाधव यांनी सरकारची बाजू मांडली तर पोलीस निरीक्षक रुनाल मुल्ला आणि पीएसआय विकास पाटील यांनी कारवाईचे पर्यवेक्षण केले.
advertisement
पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह गुन्ह्यांची वाढ चिंताजनक आहे. वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या माहितीनुसार, 2020 मध्ये पुण्यात दारू पिऊन वाहन चालवण्याचे 2,017 प्रकरणे नोंदली गेली होती, तर 2021 मध्ये फक्त 69 प्रकरणे होती. मात्र 2022 मध्ये 37, 2023 मध्ये 562 आणि 2024 मध्ये 5,293 प्रकरणे नोंदली गेली. यंदा 2025 मध्ये आतापर्यंत 3,948 प्रकरणे आधीच नोंद झाली आहेत. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की पुण्यात दारू पिऊन गाडी चालवण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
advertisement
पोलिस आणि न्यायालय या प्रकरणात अत्यंत कडक भूमिका घेत आहेत .ज्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर नक्कीच वचक बसेल. दारू पिऊन वाहन चालवणे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही तर रस्त्यावर इतर नागरिकांच्या जीवनासही धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे पुणेकरांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यावश्यक आहे.
याप्रकरणातून एक स्पष्ट संदेश मिळतो की, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना कोणतीही सवलत नाही; न्यायालय आणि पोलीस यंत्रणा अशा गुन्ह्यांवर कडक कारवाई करत आहेत. पुण्यातील नागरिकांनी या घटनांकडे गंभीरतेने पाहावे आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी नियम पाळावेत. शहरातील रस्ते सुरक्षित ठेवणे हा प्रत्येक नागरिकाचा कर्तव्य आहे. दारू पिऊन वाहन चालवणे टाळणे, सीट बेल्ट वापरणे, वाहनाचा वेग मर्यादेत ठेवणे आणि ट्रॅफिक सिग्नलचे पालन करणे या सगळ्यांमुळे रस्त्यावर अपघात आणि जीवितहानी टाळता येऊ शकते.
advertisement
या कठोर शिक्षा आणि वाढत्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहनचालकांनी स्वतःला जबाबदार नागरिक म्हणून समजून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारची कारवाई फक्त गुन्हेगारांसाठी नाही, तर ती इतर नागरिकांसाठी एक जागरूकतेचा संदेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 12:39 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीसाठी नवे नियम लागू, ती चूक महागात पडणार