Siddhivinayak Temple: बाप्पाच्या भक्तांसाठी आनंदवार्ता! श्री सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार, मेगा प्लॅन तयार

Last Updated:

Siddhivinayak Temple: मुंबईकरांचं श्रद्धास्थान प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

Siddhivinayak Temple: बाप्पाच्या भक्तांसाठी आनंदवार्ता! श्री सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार, मेगा प्लॅन तयार
Siddhivinayak Temple: बाप्पाच्या भक्तांसाठी आनंदवार्ता! श्री सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार, मेगा प्लॅन तयार
मुंबई: प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर प्रसिद्ध असून येथील बाप्पाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. आता हेच सुद्धिविनायकाचं मंदिर अधिक आधुनिक, सुरक्षित आणि भाविकांसाठी सोयीस्कर बनवण्यात येणार आहे. यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने तीन टप्प्यांत मंदिर परिसराचे सुशोभीकरण व पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार असून यासाठी एकूण 78 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू असून, पुढील दोन वर्षांत हा टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष आहे.
पहिल्या टप्प्यात काय होणार?
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भक्तांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यामध्ये लिफ्ट, एस्केलेटर, बेसमेंट पार्किंगसाठी वायुवीजन प्रणाली, तसेच अन्नदान भवनात अत्याधुनिक सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. मंदिरातील वीज आणि सुरक्षा यंत्रणाही आधुनिक केली जाणार असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली जाईल. यासोबत फायर अलार्म, स्प्रिंकलर, फायर लिफ्ट आणि इतर अग्निशमन सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
advertisement
पावसाचे आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्वच्छतागृह व पाईपलाईन सुधारणा, तसेच पाणी टाक्या आणि वॉटरप्रूफिंगची कामेही करण्यात येणार आहेत. मंदिर परिसरातील फरशी, प्रवेशमार्ग, दालन आणि छतावरील आच्छादन नव्याने करण्यात येणार आहे, जेणेकरून भाविकांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळेल.
या प्रकल्पासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून, विस्तृत प्रकल्प अहवालानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. नवीन भिंती, खांब, कमानीवरील शिल्पकाम आणि इमारतींचे फसाड क्लॅडिंग या टप्प्यांत समाविष्ट असणार आहे. या सर्व सुविधांमुळे सिद्धिविनायक मंदिर अधिक आकर्षक आणि सुरक्षित होणार असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Siddhivinayak Temple: बाप्पाच्या भक्तांसाठी आनंदवार्ता! श्री सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट होणार, मेगा प्लॅन तयार
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement