Passport Mobile Camp : पुणेकरांसाठी सुवर्णसंधी, विद्यापीठात पासपोर्ट मोबाईल कॅम्पचे आयोजन, असा घ्या फायदा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
या कॅम्पमध्ये अर्ज भरता येणार आहे तसेच, दस्तऐवज तपासता येतील आणि अर्जदारांना पासपोर्ट संदर्भात मार्गदर्शन देखील मिळणार आहे.
पुणे: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (आरपीओ) 24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एसपीपीयू) आठवडाभर चालणारा पासपोर्ट मोबाईल कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम परराष्ट्र मंत्रालयाकडून नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आयोजित केला जात आहे. या कॅम्पमध्ये अर्ज भरता येणार आहे तसेच, दस्तऐवज तपासता येतील आणि अर्जदारांना पासपोर्ट संदर्भात मार्गदर्शन देखील मिळणार आहे. नियोजित कालावधीत पासपोर्ट मोबाईल व्हॅन वाणिज्य विभाग, एसपीपीयू येथे उपलब्ध राहील. फक्त आठवड्याच्या शेवटी, म्हणजे 27 आणि 28 सप्टेंबरला ही सुविधा उपलब्ध होणार नाही.
पुणे विद्यापीठात आठवडाभर पासपोर्ट मोबाईल कॅम्प
पासपोर्ट मोबाईल कॅम्प 24, 25, 26, 29, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला आयोजित केला जाणार आहे. कॅम्प सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत चालेल. अर्जदारांनी त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे आधी कॅम्पमध्ये येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
नियुक्ती प्रक्रिया
अर्जदारांनी अधिकृत पासपोर्ट सेवा पोर्टल (www.passportindia.gov.in) वर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जासाठी लागणारे शुल्क भरल्यानंतर, त्यांनी पासपोर्ट व्हॅन, पुणे विद्यापीठ हे सेवा ठिकाण निवडून आपली अपॉइंटमेंट निश्चित करावी.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 23, 2025 4:51 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Passport Mobile Camp : पुणेकरांसाठी सुवर्णसंधी, विद्यापीठात पासपोर्ट मोबाईल कॅम्पचे आयोजन, असा घ्या फायदा