एकीकडे भारत-पाकिस्तान यांच्यातील ताणल्या गेलेल्या संबंधाचे परिणाम क्रिकेटच्या मैदानातही दिसत आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यातही वाद झाले. हारिस राऊफ आणि शाहिन आफ्रिदी यांनी अभिषेक शर्मा तसंच शुभमन गिल यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पण अभिषेक शर्मा आणि गिल यांनी बॅटने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. अभिषेक आणि गिल एवढ्यावरच थांबले नाहीत, तर दोघंही पाकिस्तानी खेळाडूंच्या अंगावर गेले, अखेर अंपायरला या वादात मध्यस्थी करावी लागली.
advertisement
भारत-पाकिस्तान खेळाडू एकाच ड्रेसिंग रूममध्ये?
भारत-पाकिस्तान यांच्यात हस्तांदोलनाचा वाद सुरू असतानाच दिग्गज भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आर.अश्विन ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसू शकतो.
आर.अश्विनला सिडनी सिक्सर्स, सिडनी थंडर्स, तसंच रिकी पॉण्टिंगची होबार्ट हरिकेन्स आणि टीम पेनच्या ऍडलेड स्ट्रायकर्सकडून ऑफर आहे. या चारपैकी एका टीमची निवड अश्विन करू शकतो, असंही या वृत्तात सांगण्यात आलं आहे. अश्विन जर बिग बॅश लीगमध्ये खेळला, तर त्याला पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करावी लागेल, कारण पाकिस्तानचे खेळाडूही बिग बॅश लीगमध्ये खेळणार आहेत. आर.अश्विनने सिडनी सिक्सर्सची ऑफर स्वीकारली तर त्याला बाबार आझमसोबत खेळावं लागेल.
बिग बॅश लीगमधील पाकिस्तानी खेळाडू
ऍडलेड स्ट्रायकर्स- हसन अली
ब्रिस्बेन हिट- शाहिन आफ्रिदी
मेलबर्न रेनेगेड्स- मोहम्मद रिझवान
मेलबर्न स्टार्स- हारिस राऊफ
सिडनी सिक्सर्स- बाबर आझम
सिडनी थंडर्स- शादाब खान